Post Office Account | पोस्ट ऑफिसमधील अकाऊंट बंद करायचे असेल तर सांभाळून ठेवा ‘हे’ कागदपत्र; जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Post Office Account | तुमचेही पोस्ट ऑफिसमध्ये खाते (Post Office Account) असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आता पोस्ट ऑफिस खाते बंद करण्यासाठी पासबुक (Passbook) आवश्यक असेल. आता पासबुक जमा केल्याशिवाय पोस्ट ऑफिस खाते बंद करणे शक्य होणार नाही.
अकाऊंट स्टेटमेंटसाठी चार्ज नाही
भारतीय टपाल विभागाने नुकत्याच काढलेल्या परिपत्रकानुसार खाते बंद करण्यापूर्वी खातेदाराला पासबुक जमा करावे लागेल. तुम्ही योजना मुदतपूर्तीनंतर बंद करत असाल तरीही पासबुक शिवाय हे काम शक्य होणार नाही. यानंतर खातेदाराला पोस्ट ऑफिसमधून अकाऊंट क्लोजर रिपोर्ट (Account Closure Report) मिळेल. जर खातेदाराने त्याच्या खात्याचे स्टेटमेंट (Account Statement) मागितले तर ते त्याला पासबुकच्या बदल्यात दिले जाईल आणि त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
पोस्ट ऑफिस सर्व खात्यांवर बदल लागू
परिपत्रकानुसार, हा बदल सर्व प्रकारच्या पोस्ट ऑफिस खात्यांवर लागू आहे. खाते मासिक बचत योजना (MIS) किंवा ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचे (Senior Citizen Saving Scheme) असो, तुम्ही पोस्ट ऑफिसमधून किसान विकास पत्र (KVP) घेतले आहे किंवा राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) खरेदी केले आहे, ते बंद करण्यासाठी पासबुक सबमिट करणे आवश्यक आहे. आवर्ती ठेव आणि मुदत ठेव खात्यांसाठी देखील हे अनिवार्य आहे. (Post Office Account)
पॅन (PAN), मोबाईल अपडेट न केल्यास वाढतील अडचणी
याशिवाय आणखी एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.
जर तुम्ही तुमच्या खात्यात तुमचा पॅन आणि मोबाईल नंबर (Mobile Number) अपडेट केला नसेल तर तुमच्या अडचणी वाढणार आहेत.
अन्यथा, तुम्ही फक्त छोटे व्यवहार करू शकाल. अशा समस्या टाळण्यासाठी, तुमच्या पोस्ट ऑफिस खात्यात पॅन आणि मोबाइल नंबर त्वरित अपडेट करा.
Web Title :- Post Office Account | post office account rule change passbook compulsory for closure pan mobile number update
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Gold Silver Price Today | सोन्याचा भाव ‘जैसे थे’ तर चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या नवीन दर
7th Pay Commission | खुशखबर ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात बदल; जाणून घ्या किती येईल पगार