Mayor Murlidhar Mohol | पुण्याचे महापौर मोहोळ यांची नाना पटोलेंवर टीका; म्हणाले – ‘राजीनामा द्या अन् येरवड्यात दाखल व्हा’

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Mayor Murlidhar Mohol | काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचं एक आक्षेपार्ह विधान सोशल मिडियावर चांगलंच व्हायरल होताना दिसत आहे. ‘मी मोदीला (PM Narendra Modi) मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला’ असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी भंडारा (Bhandara) येथील सभेत केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत (PM Narendra Modi) अपशब्द वापरल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता भाजप (BJP) चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. या विधानावरून पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Murlidhar Mohol) यांनी देखील नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्या आणि येरवडा रुग्णालयात दाखल व्हा,’ अशी जोरदार टीका महापौर मोहोळ (Mayor Murlidhar Mohol) यांनी केली आहे. महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ”काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्या आणि पुण्यातल्या ‘येरवड्या’त दाखल व्हा. तुमची बौद्धिक कुवत आणि मानसिक स्थिती पाहता, हेच योग्य आहे. नावापुरता का होईना, पण ‘राष्ट्रीय’ पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने पंतप्रधानांबद्दल काय बोलावं, याचं काडीचही भान असू नये?” असा संताप देखील त्यांनी व्यक्त केलाय.

दरम्यान, ”काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मानसिक स्थिती बिघडली आहे.
त्यांना तातडीने उपचारांची आवश्यकता आहे. महाराष्ट्र काँग्रेस स्वत:ची काळजी घेऊ शकत नाही त्यामुळे नानांच्या उपचारांसाठी आम्हीच पुढाकार घेऊन त्यांना इलाजासाठी एक हजार 1 रुपयांची मनी ऑर्डर करणार आहोत,” अशी टीका जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी केली आहे.

 

तसेच, ”पटोले यांचे वक्तव्य म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न.. आज नाना पटोले यांनी केलेले वक्तव्य अत्यंत लांछनास्पद आहे.
त्यांनी त्यांची योग्यता ओळखून बोलावे.
पटोले यांना तज्ञांकडून मानसिक उपाचारांची गरज असून लवकरात लवकर त्यांनी मानसिक उपचार घ्यावेत’’, असं देखील मुळीक म्हणाले.

Web Title :-  Mayor Murlidhar Mohol | pune mayor murlidhar mohol attack nana patole over his controversial statement of yesterday

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold Silver Price Today | सोन्याचा भाव ‘जैसे थे’ तर चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या नवीन दर

7th Pay Commission | खुशखबर ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात बदल; जाणून घ्या किती येईल पगार

Anti Corruption Bureau Pune | इंदापूरच्या तलाठ्याला लाच घेताना बारामतीत अटक

Leave A Reply

Your email address will not be published.