Gold Silver Price Today | सोन्याचा भाव ‘जैसे थे’ तर चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या नवीन दर
मुंबई : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Gold Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. वर्षाच्या सुरुवातीपासून सोन्या-चांदीच्या दरात घट होताना दिसले. आता मात्र घसरणीला ब्रेक लागला आहे. आज सोन्याचे दर जैसे थे तर चांदीच्या दरात साधारण वाढ झाली आहे. आज (मंगळवारी) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,090 रुपये आहे. तर, चांदीची किंमत (Silver Price) 62,000 रुपये पर्यंत पोहचली आहे.
आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोन्या चांदीचे दर आता वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. सध्या सोने आणि चांदीचे दर वधारले असल्याचं समोर आलं आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. (Gold Silver Price Today)
दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.
आजचा सोन्याचा दर –
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,450 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,960 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,090 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,090 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,090 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,090 रुपये
आजचा चांदीचा भाव – 62,000 रुपये (प्रति किलो).
Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 18 january 2022
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
7th Pay Commission | खुशखबर ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात बदल; जाणून घ्या किती येईल पगार
Anti Corruption Bureau Pune | इंदापूरच्या तलाठ्याला लाच घेताना बारामतीत अटक
Gold Price Today | एकमेकांच्या विरूद्ध सोने आणि चांदीची वाटचाल, जाणून घ्या आजचे नवीन दर