Skip to content

NP NEWS 24 Marathi

  • English
  • Marathi
  • Hindi

EPFO ने दूर केली पेन्शनधारकांची चिंता, महिना संपण्यापूर्वीच मिळेल पेन्शन; जाणून घ्या

by sandeep
 EPFO | epfo direction eps pensioners epf account credit delay rbi bank pension
18th January 2022
ताज्या बातम्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – EPFO आपल्या सदस्यांना येणार्‍या समस्यांवर मात करण्यासाठी सातत्याने उपाययोजना करत असते. आता पेन्शन स्कीम (Pension Scheme) ईपीएसशी (EPS) संबंधित लोकांच्या (Pensioners) समस्या दूर करण्यासाठी EPFO ने पुढाकार घेतला आहे. ईपीएसच्या पेन्शनधारकांना पैसे मिळण्यास विलंब होत होता. महिना उलटून गेला तरी पेन्शनचे (Pension) पैसे त्यांच्या खात्यात जमा होऊ शकत नव्हते.

महिना संपण्यापूर्वी मिळेल पेन्शन
पेन्शनधारकांच्या या समस्येची दखल घेत EPFO गेल्या आठवड्यात एक परिपत्रक जारी केले. आता अशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत की, पेन्शनधारकांना मार्च वगळता इतर सर्व महिन्यांच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी (Last Working Day) किंवा त्यापूर्वी पेन्शन मिळेल. मार्च महिन्याच्या बाबतीत, 1 एप्रिल किंवा त्यानंतर पेन्शन जमा केली जाऊ शकते.

क्षेत्रीय अधिकार्‍यांना दिल्या या सूचना
EPFO ने सांगितले की, पेन्शन विभागाने ही समस्या लक्षात घेतली आहे. यानंतर आरबीआयच्या सूचना लक्षात घेऊन काही निर्णय घेण्यात आले. सर्व क्षेत्रीय अधिकार्‍यांना सांगण्यात आले आहे की, मासिक बीआरएस (Monthly BRS) बँकांना पाठवताना पेन्शनधारकांच्या खात्यात पैसे वेळेवर जमा होतील याची खात्री करावी. पेन्शनची रक्कम प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी किंवा त्यापूर्वी लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करावी.

यासोबतच पेन्शनधारकांच्या खात्यात बँक जेव्हा पैसे ट्रान्सफर करेल, तेव्हा जास्तीत जास्त 2 दिवस आधी ही रक्कम बँकांना द्यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयाची योग्य अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्व कार्यालयांनी आपापल्या क्षेत्रात येणार्‍या बँकांना आवश्यक त्या सूचना देण्यास सांगण्यात आले आहे.

 

यासाठी ईपीएस अनिवार्य
ईपीएफ खाते (EPF Account) असलेले सर्व कर्मचारी ईपीएससाठी पात्र मानले जातात.
ज्या कर्मचार्‍यांचे मूळ वेतन (Basic Salary) आणि डीए मिळून 15,000 किंवा त्याहून कमी आहे त्यांच्यासाठी ईपीएस अनिवार्य आहे.
कर्मचार्‍यांच्या मूळ पगाराच्या 24 टक्के एवढी रक्कम ईपीएफमध्ये जमा केली जाते.
यापैकी 12 टक्के कर्मचार्‍यांचे आणि 12 टक्के योगदान कंपनीचे आहे. कंपनीचे 8.33 टक्के योगदान ईपीएसमध्ये जमा केले जाते.

Web Title :- EPFO | epfo direction eps pensioners epf account credit delay rbi bank pension

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Post Office Account | पोस्ट ऑफिसमधील अकाऊंट बंद करायचे असेल तर सांभाळून ठेवा ‘हे’ कागदपत्र; जाणून घ्या

Mayor Murlidhar Mohol | पुण्याचे महापौर मोहोळ यांची नाना पटोलेंवर टीका; म्हणाले – ‘राजीनामा द्या अन् येरवड्यात दाखल व्हा’

Gold Silver Price Today | सोन्याचा भाव ‘जैसे थे’ तर चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या नवीन दर

Tags: Basic salaryepf accountEPFOEPFO NewsEPFO News marathi newsEPFO News todayEPFO News today marathiEPSLast Working Daylatest EPFO Newslatest marathi newslatest news on EPFO Newsmarathi in EPFO NewsMoney TransferMonthly BRSpensionPension SchemePensionerstoday's EPFO Newsईपीएफ खातेईपीएसपेन्शनपेन्शन स्कीमपैसे ट्रान्सफरमासिक बीआरएसमूळ वेतन

  • Next Omicron Variant Alert | ‘या’ कारणामुळे वेगाने पसरतोय ओमिक्रॉन व्हेरिएंट, अशाप्रकारे करा बचाव; जाणून घ्या
  • Previous Post Office Account | पोस्ट ऑफिसमधील अकाऊंट बंद करायचे असेल तर सांभाळून ठेवा ‘हे’ कागदपत्र; जाणून घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

CM Devendra Fadnavis | If you oppose Hindi, then why not English; Chief Minister Devendra Fadnavis

Devendra Fadnavis On School Girls Assault Case Pune | पुण्यातील लैंगिक गुन्ह्याच्या घटनेनंतर फडणवीसांनी दिले मोठे आदेश; म्हणाले – ‘आता संस्थाचालकांना…’

पुणे : Devendra Fadnavis On School Girls Assault Case Pune | वानवडी (Wanwadi) येथे सहा वर्षांच्या असलेल्या दोन विद्यार्थीनींचा स्कूल...

3rd October 2024
क्राईम ताज्या बातम्या

Pooja Khedkar Case | पूजा खेडकरला कुठल्याही क्षणी अटक होणार, दिल्ली हायकोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

दिल्ली : Pooja Khedkar Case | वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ झाली आहे. ट्रायल कोर्टाच्या आदेशाविरोधात दिल्ली उच्च...

23rd December 2024
क्राईम ताज्या बातम्या राज्य

NP NEWS 24 Marathi © 2025. All Rights Reserved.

Powered by WordPress. Theme by Alx.