पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Anti Corruption Bureau Pune | हक्कसोड पत्राची नोंद करण्यासाठी १८ हजार रुपयांची मागणी करुन १२ हजार रुपयांची लाच घेताना इंदापूर (Indapur) तालुक्यातील एका तलाठ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बारामतीमध्ये (Baramati) रात्री उशिरा अटक केली. प्रवीण भगत (Pravin Bhagat) असे या तलाठ्याचे नाव आहे. (Anti Corruption Bureau Pune)
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण भगत हा इंदापूर तालुक्यातील कुरवली गावाचा तलाठी आहे. तक्रारदाराने हक्कसोड पत्राची नोंद करण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जाची नोंद करण्यासाठी भगत याने १८ हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्याची पडताळणी केली असता तडजोड करुन १२ हजार रुपये लाच घेण्यास मान्यता दिली. भगत हा बारामतीमध्ये राहतो. त्याने तक्रारदार याला लाचेचे पैसे घेऊन घरी बोलावले होते. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रात्री उशिरा बारामतीतील भगत याच्या घराबाहेर सापळा रचला. तक्रारदाराकडून लाच घेताना प्रवीण भगत याला रंगेहाथ पकडण्यात आहे.
पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (ACB SP Rajesh Bansode), अपर अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav),
अपर अधीक्षक सुहास नाडगौडा (Addl SP Suhas Nadgauda) यांच्या मार्गदर्शनाखाली हा सापळा आयोजित करण्यात आला होता.
Web Title :- Anti Corruption Bureau Pune Arrested Indapur Talathi in Bribe Case at Baramati
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Gold Price Today | एकमेकांच्या विरूद्ध सोने आणि चांदीची वाटचाल, जाणून घ्या आजचे नवीन दर
LIC Jeevan Shiromani | केवळ 4 वर्षात तुम्हाला करोडपती बनवू शकते ‘ही’ LIC Policy, जाणून घ्या सविस्तर
Ration Card वर इतर कुणी घेत असेल लाभ तर रद्द होईल तुमचे कार्ड आणि भरावा लागेल दंड? जाणून घ्या