Low Haemoglobin Level | रक्ताची कमतरता असल्यास शरीर देते ‘हे’ 5 संकेत, ही लक्षणे आढळली तर व्हा सावध

0

एन पी न्यूज 24 ऑनलाइन टीम – Low Haemoglobin Level | शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. अनेकदा थकवा जाणवणे, अशक्तपणा आणि चक्कर येणे ही समस्या कमी हिमोग्लोबिनची लक्षणे आहेत. रक्ताच्या कमतरतेमुळे, तुम्ही अ‍ॅनिमियाला (Anemia) बळी पडू शकता. ही समस्या महिलांमध्ये जास्त आढळते. (Low Haemoglobin Level)

शरीरातील हिमोग्लोबिनचे कार्य ऑक्सिजनचा Supply करणे आहे. रक्तातील हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अनेक प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक समस्यांना बळी पडू शकते.

हिमोग्लोबिन कमी होण्याचे कारणे (Causes of low hemoglobin)
रोजच्या आहारात लोहाच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिन कमी होऊ शकते. महिलांमध्ये गर्भधारणेमुळे शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होऊ शकते. मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव हे याचे कारण असू शकते.

शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असल्यास जंक फूडचे सेवन टाळावे. जीवनसत्त्वे आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळेही समस्या उद्भवू शकते, त्यामुळे जीवनसत्त्वे आणि कॅल्शियमने युक्त असलेल्या गोष्टी खा.

या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष
खूप थकवा जाणवणे. त्वचा पिवळी पडणे आणि कमकुवत वाटणे ही हिमोग्लोबिनच्या कमतरतेची लक्षणे आहेत. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास हृदयाचे ठोके जलद होण्याची समस्या देखील असू शकते. यामुळे तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होतो. (Low Haemoglobin Level)

जेव्हा शरीरात रक्त कमी होते, तेव्हा ऑक्सिजनची कमतरता देखील असते.
यामुळे श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो आणि जडपणा जाणवू शकतो.
ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे शरीरातील रक्ताभिसरण देखील कमी होऊ शकते.

कमी हिमोग्लोबिनमुळे डोकेदुखी आणि छातीत दुखू शकते. जेव्हा शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते
तेव्हा तुम्हाला थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो. अशा स्थितीत कोणतेही काम करताना थकवा लवकर येतो.

शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे संधिवात, कर्करोग आणि किडनीशी संबंधित आजारांचा धोकाही वाढतो.

 

Related Posts