Earn Money | नोकरी सोडून सुरू करा ‘हा’ सुपरहिट व्यवसाय, महिन्याला ₹1 लाखांपर्यंत कमवा; सरकारकडून मिळेल सबसिडी

0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Earn Money | जर तुम्हाला व्यवसायासाठी (How to Start Business) कृषी क्षेत्रात तुमचे नशीब आजमावायचे असेल, तर हवामानावर अवलंबून असलेल्या शेतीबरोबरच अनेक पर्याय आहेत जे तुम्हाला नफ्याची हमी देतात. यापैकी एक व्यवसाय म्हणजे कुक्कुटपालन (Poultry Farming). जर तुम्हाला लहान प्रमाणात पोल्ट्री फार्म सुरू करायचा असेल तर किमान 50,000 ते 1.5 लाख रुपये खर्च येईल. जर तुम्ही कमी स्तरातून म्हणजे 1500 कोंबड्यांपासून लेयर फार्मिंग सुरू केले तर तुम्हाला महिन्याला 50 हजार ते 1 लाख रुपये कमावता (Earn Money) येतील.

सर्वप्रथम पैशाचा मुद्दा येतो

जर तुम्हाला कमी स्तरावरी पोल्ट्री फार्म सुरू करायचे असेल तर किमान 50,000 ते 1.5 लाख रुपये खर्च येईल. आणि जर तुम्ही एखाद्या मोठ्या स्तरावर हा व्यवसाय उभा करण्याचा विचार करत असाल तर त्याची किंमत 1.5 लाख ते 3.5 लाख रुपये आहे. पोल्ट्री व्यवसाय सुरू (Earn Money) करण्यासाठी अनेक फायनांशियल संस्थांकडून बिजनेस लोन घेता येते.

सरकार 35 टक्के अनुदान देईल

पोल्ट्री फार्म व्यवसाय कर्जावरील अनुदान सुमारे 25 टक्के आहे. तसेच SC-ST वर्गाला प्रोत्साहन देण्यासाठी हे अनुदान 35 टक्क्यांपर्यंत असू शकते. या व्यवसायाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये काही रक्कम गुंतवावी लागेल आणि बाकीची रक्कम बँकेकडून कर्जच्या स्वरूपात मिळेल.

अशा प्रकारे या व्यवसायाचे नियोजन करा

कमाई चांगली होत असली तरीही या व्यवसायात हात आजमावण्यापूर्वी योग्य प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. 1500 कोंबड्यांचे टार्गेट ठेवून काम सुरू करायचे असेल तर 10 टक्के जास्त कोंबड्या खरेदी कराव्या लागतील. कारण अवकाळी रोगामुळे कोंबड्यांचा मृत्यू होण्याचा धोका असतो.

अंड्यातूनही प्रचंड कमाई होईल

देशात अंड्याचे भाव वाढू लागले आहेत. ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून अंडी
सात रुपयांना विकली जात आहेत. मात्र आश्‍चर्यकारक बाब म्हणजे अंड्याच्या किमतीत
वाढ झाल्याने कोंबडीही मौल्यवान बनली आहे.

 

कोंबडी खरेदीकरण्यासाठी 50 हजार रुपयांचे बजेट

लेयर पॅरेंट बर्डची किंमत सुमारे 30 ते 35 रुपये आहे. म्हणजेच कोंबडी खरेदी करण्यासाठी 50 हजार रुपयांचे बजेट ठेवावे लागणार आहे. तसेच त्यांना वाढवण्यासाठी विविध प्रकारचे अन्न द्यावे लागते आणि औषधांवरही खर्च करावा लागतो.

20 आठवड्यांचा खर्च रु.3-4 लाख

कोंबड्यांना सलग 20 आठवडे आहार देण्यासाठी सुमारे 1 ते 1.5 लाख रुपये खर्च येतो. एक लेयर पॅरेंट बर्ड एका वर्षात सुमारे 300 अंडी देते. 20 आठवड्यांनंतर कोंबड्या अंडी घालू लागतात आणि वर्षभर अंडी घालतात. 20 आठवड्याच्या त्यांच्या खाण्यापिण्यावर सुमारे 3 ते 4 लाख रुपये खर्च होतो.

 

वर्षाला 14 लाखांपेक्षा जास्त कमाई.

अशा स्थितीत 1500 कोंबड्यांपासून 290 अंडी मिळाली तर वर्षाला सरासरी मिळून सुमारे 4,35,000 अंडी मिळतात.
नुकसान झाल्यानंतरही 4 लाख अंडी विकता येत असतील तर एक अंडे जास्त प्रमाणात 6 रुपये दराने विकले जाते.
म्हणजेच एका वर्षात तुम्ही फक्त अंडी विकूनहि भरपूर कमाई करू शकता.


Web Title :-
 Earn Money | business idea earn money start poultry farming low cost business and earn 1 lakh monthly

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Mustard Oil-Hair Problems | ‘हे’ तेल लावायला करा सुरुवात, केस गळणे थांबेल तसेच केस होतील काळे, दाट आणि मुलायम

7th Pay Commission | पेन्शनर्सच्या खात्यात लवकरच जमा होतील ‘या’ भत्त्याचे हजारो रुपये, सरकारने केली घोषणा

Cold-Cough-Runny Nose | हिवाळ्यात वाहत्या नाकामुळे त्रस्त आहात का? रोखण्यासाठी अवलंबा ‘या’ टिप्स, मिळेल आराम

Leave A Reply

Your email address will not be published.