CNG Rate Hike in Pune | पुण्यात सीएनजी पुन्हा 2 रूपयांनी महागला
पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – CNG Rate Hike in Pune | गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे (Fuel) दर गगनाला भिडले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol And Diesel) वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली. दरम्यान मागील काही दिवसांपासून थोड्या प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र, सीएनजी (CNG) वाहन वापरत असलेल्यांना आता दरवाढीची झळ सोसावी लागत आहे. गरूवारी (13 जानेवारी) रोजी सीएनजी दोन रुपये 10 पैशांनी महागले आहे. या वाढीनंतर पुणे शहरात (Pune News) एक किलो सीएनजीसाठी 66.00 रुपये द्यावे लागणार आहे. (CNG Rate Hike in Pune)
नोव्हेंबर 2021 नंतर झालेली या वर्षातील ही पहिली किंमतवाढ आहे. याआगोदर ऑगस्ट महिन्यात सीएनजी 4 रुपये 60 पैशांनी महागला होता. 4 आणि 14 ऑक्टोंबर रोजी अनुक्रमे 2 आणि 2.6 रुपयांनी सीएनजीच्या किंमतीत वाढ झाली होती. तर, एकदाच महिन्यात 4 रुपयांनी दरवाढ झाल्याची ती पहिलीच घटना होती. दिवाळीमध्ये पेट्रोल 5 रुपयांनी आणि डिझेल 10 रुपयांनी स्वस्त झालं होतं. त्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला होता. दरम्यान, पेट्रोल-डिझेलचा भाव वाढला नसला तरी सीएनजीच्या (CNG) किंमतीत वाढ होत आहे. (CNG Rate Hike in Pune)
आजचे (13 जानेवारी) दर :
पेट्रोल – 109.50
पॉवर पेट्रोल – 113.50
डिझेल – 92.50
सीएनजी – 66.00 (प्रतिकिलो)
Web Title :- CNG Rate Hike in Pune | cng price has been hiked by rs 2 per kg again in pune
Join our Telegram, facebook page and Twitter for every update
Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, वर्षभरासाठी सर्व स्कूल बसचा ‘वाहन कर’ माफ
Gold Silver Price Today | सोन्या-चांदीचे दर वधारले; जाणून घ्या आजचा लेटेस्ट भाव
PM Kisan Samman Nidhi Yojana | पीएम किसान योजनेचे पैसे ‘या’ शेतकऱ्यांना परत करावे लागणार; जाणून घ्या