Supreme Court On Dowry | सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्णय ! सासरकडून पैसा किंवा मागितले जाणारे कोणतेही सामान हुंडा मानला जाईल

0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Supreme Court On Dowry | सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) घराच्या बांधकामासाठी पैशाच्या मागणीला हुंडा म्हणत गुन्हा ठरवले. मुख्य न्यायाधीश जस्टिस एन. व्ही. रमण (Chief Justice N. V. Raman) , जस्टिस ए. एस. बोपन्ना (Justice A. S. Bopanna) आणि जस्टिस हिमा कोहली (Justice Hima Kohli) यांच्या खंडपीठाने म्हटले, हुंडा (Supreme Court On Dowry) शब्दाचे एका व्यापक अर्थाने वर्णन केले पाहिजे, जेणेकरून महिलेकडून कोणत्याही मागणीचा समावेश करता येऊ शकतो, मग ती संपत्ती असो किंवा कोणत्याही प्रकारच्या मौल्यवान वस्तू.

खालच्या न्यायालयाने या प्रकरणात मृत महिलेचा पती आणि सासर्‍याला भा.दं.वि. (IPC) कलम-304-बी (हुंडाबळी), आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे आणि हुंड्यासाठी छळ या अंतर्गत दोषी ठरवले होते. असे आढळून आले की, मृत महिलेकडून आरोपी घर बांधण्यासाठी पैशांची मागणी करत होता, जे तिचे कुटुंबिय देण्यास असमर्थ होते. यासाठी महिलेला सतत त्रास देण्यात आला, ज्यामुळे तिने आत्महत्या केली. या निर्णयाविरूद्ध दाखल अपीलावर मध्य प्रदेश हायकोर्टाने (Madras High court) म्हटले, घराच्या बांधकामासाठी पैशाच्या मागणीला हुंड्याची मागणी मानता येऊ शकत नाही. (Supreme Court On Dowry)

 

एका महिलेने दुसरीला न वाचवणे, हा गंभीर गुन्हा
अन्य एका हुंडाबळी प्रकरणात सासूचे अपील फेटाळत सुप्रीम कोर्टाने म्हटले, जेव्हा एक महिलाच दुसर्‍या महिलेला वाचवत नसेल तर हा गंभीर गुन्हा आहे. कोर्टाने सासूला दोषी ठरवत तीन महिन्याची शिक्षा सुनावली. पीठाने म्हटले, हे अतिशय भयंकर स्थिती आहे की, जेव्हा एक महिला आपल्या सूनेसोबत अशा क्रुरपणे वागते की ती आत्महत्येचे पाऊल उचलते.

 

Web Title :-  Supreme Court On Dowry | dowry supreme court any material demand by in laws should be considered dowry crime News

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

जर सर्व कागदपत्रे नसतील तरीही Ration Card मध्ये आपल्या मुलाचे नाव नोंदवू शकता, जाणून घ्या पद्धत

Pune Crime | बनावट फेसबुक अकाऊंटवर महिलेची बदनामी अन् आत्महत्येची धमकी; बलात्काराच्या गुन्ह्यानंतरही महिलेला देतोय त्रास

Pune Crime | पुण्यात टिळक रस्त्यावर भरदिवसा तरुणीसमोर ‘हस्तमैथून’ करणारा CCTV त कैद, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु

Maharashtra Police Transfer | वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांची यादी मुख्यमंत्र्यांच्या सहीशिवाय व्हायरल, गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

Multibagger Penny Stock | एक रुपयांच्या स्टॉकने अवघ्या 1 वर्षात दिला 7000% रिटर्न, रू. 1 वरून वाढून झाला रू. 71 चा, तुमच्याकडे आहे का?

Leave A Reply

Your email address will not be published.