जर सर्व कागदपत्रे नसतील तरीही Ration Card मध्ये आपल्या मुलाचे नाव नोंदवू शकता, जाणून घ्या पद्धत

0

नवी दिल्ली – वृत्त संस्था  – Ration Card | रेशनकार्ड हे महत्त्वाचे कागदपत्र म्हणून वापरले जाते. याद्वारे गरीब कुटुंबांना कमी दरात रेशन दिले जाते. रेशनमध्ये धान्यासोबत मीठ, हरभरा, तेलही मोफत दिले जात आहे. याशिवाय बँकेत खाते उघडण्यासाठी आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठीही रेशनकार्डचा (Ration Card) वापर केला जातो.

रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव टाकण्याची चिंता अनेकवेळा लोकांना सतावते. विशेषत: लहान मुलांचे रेशनकार्डमध्ये नाव समाविष्ट होण्यासाठी लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. परंतु आता तुमच्याकडे फक्त काही कागदपत्रे असतील तरी तुम्ही याच्या मदतीने मुलांचे नाव तुमच्या शिधापत्रिकेशी सहजपणे लिंक करू शकता. ही संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया…

कोणती कागदपत्रे आवश्यक

मुलाचे नाव शिधापत्रिकेत टाकायचे असेल तर रेशनकार्ड प्रमुखाचा पासपोर्ट (Passport) आकाराचा फोटो आवश्यक आहे. यासोबतच तुमच्याकडे महानगरपालिका, नगरपालिका किंवा ग्रामपंचायतींनी (Grampanchayat) दिलेले मुलाचे जन्म प्रमाणपत्र (Dirth Certificate) असणे आवश्यक आहे. यासोबतच आधार कार्ड देखील आवश्यक आहे, आधार कार्ड नसल्यास ते बनवावे.

असे नोंदवा नाव

जर सर्व योग्य कागदपत्रे असतील आणि नाव शिधापत्रिकेत टाकायचे असेल तर त्यासाठी एक फॉर्म भरावा लागेल. फॉर्म योग्यरित्या भरा आणि कार्यालयात मार्फत सबमिट करा. अधिकार्‍याला तुम्ही सादर केलेला अर्ज आणि कागदपत्रे बरोबर असल्याचे आढळल्यास, लवकरच तुमच्या मुलाचे नाव शिधापत्रिकेत (Ration Card) जोडले जाईल. यासाठी तुम्हाला कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही.

 

ऑनलाइन असे नोंदवा नाव

सर्वप्रथम राज्याच्या अन्न पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
यानंतर तुमचा आयडी बनवा.
आता Add New Member या पर्यायावर क्लिक करा.
यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म उघडेल, कुटुंबाची माहिती येथे अपडेट करा.
कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी देखील फॉर्मसोबत अपलोड करा.
फॉर्म सबमिट केल्यावर नोंदणी क्रमांक दिला जाईल. यासोबतच तुम्ही पोर्टलवरून फॉर्मचा मागोवा घेऊ शकता.
यानंतर कागदपत्रे आणि फॉर्मची पडताळणी होईल.
फॉर्म स्वीकारल्यानंतर, शिधापत्रिका पोस्टाद्वारे तुमच्या घरी येईल, ज्यामध्ये नवीन सदस्याचे नाव जोडले जाईल.

Web Title :- Ration Card | even if you do not have complete documents you can add your child name in ration card

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | बनावट फेसबुक अकाऊंटवर महिलेची बदनामी अन् आत्महत्येची धमकी; बलात्काराच्या गुन्ह्यानंतरही महिलेला देतोय त्रास

Pune Crime | पुण्यात टिळक रस्त्यावर भरदिवसा तरुणीसमोर ‘हस्तमैथून’ करणारा CCTV त कैद, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु

Maharashtra Police Transfer | वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांची यादी मुख्यमंत्र्यांच्या सहीशिवाय व्हायरल, गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

Leave A Reply

Your email address will not be published.