Coronavirus in Maharashtra | राज्यात कोरोनाचा हाहा:कार! गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 46,723 नवे रुग्ण, मृतांचा आकडा वाढला; जाणून घ्या इतर आकडेवारी

0

मुंबई : एन पी न्यूज 24 – राज्यात कोरोनाचा संसर्ग (Coronavirus in Maharashtra) मागील काही दिवसांपासून वाढत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 46 हजार 723 नव्या रुग्णांची भर पडली असून 32 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 28 हजार 041 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात मंगळवारी 34 हजार 424 रुग्णांची (Coronavirus in Maharashtra) नोंद झाली होती. त्या तुलनेत आज जवळपास 12 हजार अधिक रुग्णांची भर पडल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे राज्याच्या चिंतेत भर पडली आहे. राज्यात आज 86 ओमायक्रॉनबाधित (Omaicron) रुग्णाची नोंद झालेली आहे.

राज्यात आज 28 हजार 041 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 66 लाख 49 हजार 111 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.52 टक्के झाले आहे. राज्यात आज 32 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 41 हजार 701 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 2.01 टक्के झाला आहे.

 

राज्यात आजपर्यंत 7 कोटी 11 लाख 42 हजार 569 प्रयोगशाळा तपसण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 70 लाख 34 हजार 661 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 9.85 टक्के आहे. सध्या 2 लाख 40 हजार 122 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 15 लाख 29 हजार 452 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत. तर 6951 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.

 

Web Title :- coronavirus in maharashtra | corona 46,723 new patients in state in last 24 hours find out other statistics

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Miss Maharashtra Police Pratibha Sangle | पोलीस कॉन्स्टेबल झाली ‘मिस महाराष्ट्र’, शेतकऱ्याच्या पोरीनं केली ‘कमाल’

Maharashtra Rains | महाराष्ट्रात आणखी 3 दिवस मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

PM Jan-Dhan Account मध्ये जमा रक्कमेबाबत मोठे अपडेट, जाणून घ्या काय सांगतात Finance ministry चे हे आकडे

Leave A Reply

Your email address will not be published.