Pimpri Corona Updates | पिंपरी चिंचवडमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 8 हजारांवर, गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 1706 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

0

पिंपरी : एन पी न्यूज 24 – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना (Pimpri Corona Updates) रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत असताना ओमायक्रॉन व्हेरियंटने (Omycron Variant) चिंता वाढवली आहे. रुग्ण वाढत असल्याने शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या पुन्हा वाढली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona Updates) 1706 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या 24 तासात महापालिका हद्दीबाहेरील एका रुग्णाच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (PCMC) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 1706 नवीन रुग्ण (Pimpri Corona Updates) आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 87 हजार 919 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 387 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 2 लाख 76 हजार 110 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शहरामध्ये सध्या 8013 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active Patient) आहेत. यामध्ये होम क्वारंटाईनमध्ये 7610 तर संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये 403 रुग्ण आहेत. आज दिवसभरात शहरातील एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,527 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 17 हजार 536 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारामध्ये 31 लाख 12 हजार 796 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title : – Pimpri Corona Updates | Number of active patients in Pimpri Chinchwad over 8000, diagnoses of 1706 patients of ‘Corona’ in last 24 hours, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Railway Protection Force (RPF) | रेल्वे सुरक्षा दलात (RPF) भरतीची जाहिरात बोगस, विश्वास न ठेवण्याचे रेल्वे प्रशासनाकडून आवाहन

Pune Corona Updates | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 3459 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Ration Card | रेशन कार्डमध्ये जोडू शकता नवीन नाव, ‘ही’ आहे सर्वात सोपी पद्धत

Confirmed Railway Ticket | खुशखबर ! आता पोस्ट ऑफिसमध्ये मिळेल ट्रेनचे कन्फर्म तिकिट, जाणून घ्या पद्धत

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांच्या बरोबरीने सेवालाभांचा दावा करू शकत नाहीत ‘हे’ कर्मचारी – कोर्ट

Leave A Reply

Your email address will not be published.