Immunity Booster | सर्दी आणि फ्लू सारख्या लक्षणांमध्ये लवकर आराम देईल ‘हा’ आयुर्वेदिक काढा

0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Immunity Booster | व्हायरल इन्फेक्शनचा (viral infection symptoms) धोका कमी करण्यासाठी, सामाजिक अंतर राखणे (Social Distance), मास्क घालणे (Wearing Mask) आणि स्वच्छता पाळणे (Cleaness) यासारख्या काही मूलभूत गोष्टींचे पालन केले पाहिजे. पण यासोबतच तुम्ही दिवसभरात जे काही खाता आणि पिता ते तुम्हाला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. (Immunity Booster)

पौष्टिक भाज्या (Nutritious Vegetables), फळे (Fruits) आणि मसाल्यांनी समृद्ध असलेले खाद्यपदार्थ आणि पेये इम्युनिटी (Immunity Booster) वाढवतात. तसेच व्हायरल इन्फेक्शनची शक्यता कमी करण्यास मदत करतात. मजबूत इम्युनिटीसाठी काढा देखील घेऊ शकता. (ayurvedic kadha for viral infection)

इम्युनिटी वाढवण्यासाठी काढा (ayurvedic kadha)
इम्युनिटी वाढवण्यासाठी तुम्ही खूप हेल्दी काढा बनवू शकता. हा काढा मसाले आणि औषधी वनस्पती वापरून तयार केला जातो. हे मसाले आणि औषधी वनस्पती औषधाचे काम करतात. हा नैसर्गिक घटकांचा वापर करून बनवलेले आहे आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. इम्युनिटी वाढवण्यासाठी काढा कसा बनवायचा जाणून घेवूयात. (Immunity Booster)

साहित्य


1 इंच ताजे आले


1-2 गुळाचे तुकडे


काळी मिरीचे काही तुकडे


चिमूटभर ओवा


दालचिनीच्या 3-4 छोट्या काड्या


1-2 स्टार बडीशेप


लवंगाचे 5-6 तुकडे


1-2 तुकडे काळी वेलची (मोठी वेलची)


1 टीस्पून घरगुती चहा मसाला

 

असा बनवा काढा
एका पातेल्यात 2 ग्लास पाणी घेऊन गॅसवर उकळायला ठेवा. त्यात किसलेले आले व इतर साहित्य घाला. पाणी काळे होईपर्यंत 7 ते 10 मिनिटे उकळू द्या. काढा एका ग्लासमध्ये गाळून घ्या आणि कोमट करून प्या.

काढ्याचे फायदे
काळी मिरी, ओवा, लवंगा, स्टार बडीशेप आणि वेलची यांसारख्या मसाल्यांमध्ये अँटी इम्फ्लामेटरी आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. ते घसा खवखवणे, सर्दी आणि खोकला यामध्ये आराम देण्यास मदत करतात.

अनेक अभ्यासानुसार, आहारात मसाल्यांचा समावेश केल्यास तुमचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. यामुळे इम्युनिटी देखील मजबूत होते तसेच फ्री रॅडिकल्समुळे होणार्‍या नुकसानापासून तुमचे संरक्षण करतात.

याशिवाय आल्यामध्ये अँटी इम्फ्लामेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. हे जळजळ दूर करण्यास मदत करतात. या ड्रिंकमध्ये थोड्या प्रमाणात गूळ टाकल्यास चव तर वाढतेच शिवाय श्वसनसंस्थेसाठीही फायदेशीर ठरते. हे तुमचे शरीर डिटॉक्स करते आणि सर्दी आणि फ्लूशी लढते.

टीप – या लेखात समाविष्ट असलेल्या कोणत्याही माहिती/साहित्य/गणनेच्या अचूकतेची किंवा विश्वासार्हतेची हमी दिलेली नाही. आमचा उद्देश केवळ माहिती प्रसारित करणे हा आहे, वापरकर्त्यांनी ती केवळ माहिती म्हणून घ्यावी. शिवाय, त्याचा कोणताही उपयोग वापरकर्त्याची स्वतःची जबाबदारी असेल.


Web Title :
– Immunity Booster | immunity booster this ayurvedic decoction will give quick relief from cold and flu like symptoms

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Omicron Symptoms | ओमिक्रॉनचे ‘हे’ लक्षण सर्वप्रथम दिसून येते, व्हॅक्सीन घेतलेल्या लोकांमध्ये सुद्धा दिसतोय ‘हा’ संकेत

7th Pay Commission Update | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! अकाऊंटमध्ये क्रेडिट होतील 2 लाख रुपये, 18 महिन्याच्या DA एरियर बाबत मोठे अपडेट

Pune Crime | पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी ! शिरसाई मंदिरात चोरी करणारी टोळी गजाआड, 25 मंदिरातील चोरीचे गुन्हे उघड

Pune Crime | पुण्यात अवैध खासगी सावकारी करणार्‍यांवर गुन्हे

Leave A Reply

Your email address will not be published.