Confirmed Railway Ticket | खुशखबर ! आता पोस्ट ऑफिसमध्ये मिळेल ट्रेनचे कन्फर्म तिकिट, जाणून घ्या पद्धत

0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Confirmed Railway Ticket | तुम्हीही ट्रेनने प्रवास (Indian Railways) करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी मोठा दिलासा देणारी आहे. होय, आता तुम्ही ट्रेनने प्रवास करण्यासाठी रेल्वे स्टेशनवर (Railway Station) न जाताही तुमचे तिकीट ऑफलाइन मिळवू शकता. आता IRCTC ने सर्व प्रवाशांना ट्रेनमध्ये सीट रिझर्वेशन (Rail Ticket Reservation) करण्यासाठी एक नवीन सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. आता तुम्ही तुमचे रेल्वे तिकीट तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमधून (Train Ticket Booking In Post Office) देखील मिळवू शकता. (Confirmed Railway Ticket)

आता तुम्हाला तिकीट काढण्यासाठी लांबच लांब रांगेत उभे राहण्याची चिंता करावी लागणार नाही. आता तुम्ही पोस्ट ऑफिसला भेट देऊन कन्फर्म Rail Ticket मिळवू शकता.

पोस्ट ऑफिसमध्ये कन्फर्म ट्रेन तिकीट
इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने रेल्वे प्रवाशांना एक आनंदाची बातमी दिली आहे. आता रेल्वेने प्रवास करू इच्छिणार्‍या सर्व प्रवाशांना त्यांच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमधून त्यांचे रेल्वे तिकीट सहज मिळू शकणार आहे.

यामुळे प्रवाशांना प्रत्येक वेळी प्रवास करताना रेल्वे स्थानकाच्या आरक्षण काउंटरवर तासन्तास उभे राहावे लागणार नाही. यासोबतच स्थानकावरील गर्दीही कमी होऊन लोकांना त्यांच्या जवळील तिकीट काढण्याची सुविधा मिळणार आहे. (Confirmed Railway Ticket)

उत्तर प्रदेशातून होईल सुरुवात
ही सुविधा सध्या उत्तर प्रदेशमधून सुरू केली जाणार आहे. यूपीमध्ये 9147 पोस्ट ऑफिस आहेत.
जिथे तुम्हाला पोस्ट ऑफिसमधूनच तिकीट बुकिंगची सुविधा मिळेल. याचा सर्वात मोठा फायदा असा होणार आहे की,
आता कोणालाही तिकीट काढण्यासाठी एजंटांकडे जाण्याची गरज भासणार नाही. आणि त्यांना वाजवी दरात रेल्वे तिकीट किंवा सीट आरक्षण मिळेल.

 

ग्रामीण भागातील ग्राहकांना मिळणार लाभ
पोस्ट ऑफिसमधून तिकीट बुकिंगचा सर्वाधिक फायदा ग्रामीण भागातील नागरिकांना होणार आहे.
कारण जवळपास एखादे रेल्वे स्टेशन असो किंवा इंटरनेट सारखी दुसरी सुविधा नसली तरी पोस्ट ऑफिसची सुविधा या भागात नक्कीच उपलब्ध आहे.
आता तुम्हाला पोस्ट ऑफिसमधून रेल्वे तिकीट मिळण्याच्या सुविधेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांनाही त्यांचे आरक्षण सहज करता येणार आहे.

6 जानेवारीपासून झाली सुरूवात
रेल्वे आणि दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 6 जानेवारीपासून याची सुरुवात केली आहे.
त्यांनी सांगितले की राज्यात एकूण 9147 पोस्ट ऑफिस आहेत येथून नागरिक त्यांचे रेल्वे आरक्षण तिकीट काढू शकतात.

लवकरच या सुविधेचा लाभ देशातील इतर राज्यातील नागरिकांनाही मिळेल, अशी अपेक्षा आहे.

Web Title :- Confirmed Railway Ticket | train ticket IRCTC indian railways news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांच्या बरोबरीने सेवालाभांचा दावा करू शकत नाहीत ‘हे’ कर्मचारी – कोर्ट

Fort In Pune | पुणे जिल्ह्यातील गड-किल्ल्यांसह सर्व पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी बंद, ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाचा मोठा निर्णय

PM Jeevan Jyoti Bima Yojana (PMJJBY) | प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2022 : ऑनलाइन अर्ज कसा करावा जाणून घ्या सविस्तर

Leave A Reply

Your email address will not be published.