Pune Crime | पुण्याच्या बिबवेवाडीत इंजिनिअरकडून एकाचा चाकूने भोकसून खून; कारण समोर आल्यानंतर पोलिसही झाले हैराण

0

पुणे :  एन पी न्यूज 24 – Pune Crime | बांधकामाचा कचरा शेजारच्या घरावर पडल्याने झालेल्या वादातून इंजिनिअरने (Engineer) रागाच्या भरात एकाचा खून (Murder in Pune) केल्याची खळबळजनक घटना पुण्यातील (Pune Crime) बिबवेवाडी (Bibvewadi) परिसरात घडली आहे. ही घटना आज (सोमवारी) सकाळी दहाच्या सुमारास बिबवेवाडी सुखसागर नगर (Sukhsagar Nagar Bibvewadi) भाग 2 येथे घडली आहे. आरोपी इंजिनीअरने छातीत चाकू भोकसून खून (Pune Crime) केला. खूनाचे कारण समोर आल्यानंतर पोलिस अधिकारी देखील चक्रावून गेले. अतिशय क्षुल्लक कारणावरून खून झालेला आहे.

भरत सीताराम पुरी Bharat Sitaram Puri (वय-39 रा. सुखसागर नगर, लेन नं.5, श्रीनाथ बिल्डिंग, 3 रा मजला, सुखसागर नगर भाग 2 कात्रज – Katraj) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सचिन विठ्ठल कपटकर Sachin Vitthal Kapatkar (वय-46 रा. अर्णव बंगला, सुखसागरनगर भाग -2 कात्रज) असे गुन्हा (FIR) दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत भरत सिताराम पुरी Bharat Sitaram Puri (वय-39) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibwewadi Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या शेजारी राहतात. फिर्यादी यांचे नवीन घराचे बांधकाम सुरु आहे. या बांधकामाचा (Construction) कचरा (रॅबीट) आरोपी सचिन कपटरकर यांच्या गाडीवर आणि बंगल्याच्या कंपाउंडमध्ये पडले. यावरुन आरोपी आणि फिर्यादी यांचा भाऊ भरत यांच्यात वाद झाला. आरोपीने शरद याला शिवीगाळ करुन हातातील धारदार चाकूने भरत पुरी याच्या डाव्या छातीजवळ भोकसला. यामध्ये गंभीर जखमी होऊन भरत यांचा मृत्यू झाला. तसेच फिर्यादी यांच्या पत्नीला चाकूचा धाक दाखून मारण्याची धमकी दिली. आरोपी कपटकर हा इलेक्ट्रिकल इंजिनिअर (Electrical Engineer) असून सध्या त्याला कोणतेच काम नसल्याने तो घरीच असतो.

 

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील (DCP Namrata Patil),
सहाय्यक पोलिस आयुक्त राजेंद्र गलांडे (ACP Rajendra Galande),
बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल झावरे
(Senior Police Inspector Sunil Zaware) , पोलिस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे (API Pravin Kalukhe) करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime | One stabbed to death by engineer in Bibvewadi, Pune; Bibvewadi police station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | 50 वर्षीय महिलेचा निर्घृण खून, बारामती तालुक्यातील खळबळजनक घटना

PNB | ‘या’ बँकेच्या खात्यामध्ये ठेवावे लागणार किमान 10 हजार; नाहीतर ग्राहकास 600 रुपये दंड, जाणून घ्या

Pune Corona Updates | पुणेकरांची चिंता कायम ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 3 हजारांहून अधिक रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Leave A Reply

Your email address will not be published.