Pune Crime | पुण्यात अवैध खासगी सावकारी करणार्‍यांवर गुन्हे

0

पुणे :  एन पी न्यूज 24  – पुण्यात (Pune Crime) खासगी सावकारांचा सुळसुळाट झाला आहे. खासगी सावकारांकडून कर्जाची वसुली करण्यासाठी तगदा लावला जातो. सावकाराकडून होत असलेल्या पठाणी व्याज वसुलीच्या (Interest Recovery) संदर्भात पोलिसांकडे अनेक तक्रारी येत आहेत. खासगी सावकारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी (Pune Police) हेल्पलाइन (Helpline) सुरु केली आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत असून हेल्पलाईनवर आलेल्या 12 तक्रारीवरुन 7 खासगी सावकारांविरुद्ध गुन्हे (FIR) दाखल करण्यात आले आहेत. यामुळे अवैध सावकारी (Illegal Money Lenders) करणाऱ्यांचे धाबे (Pune Crime) दणाणले आहेत.

पुणे शहरात खासगी सावकाराकडून अडचणीत सापडेल्यांना दरमहा 5 ते 50 टक्के दराने कर्ज दिले जाते. त्यानंतर हे सावकार पठाणी पद्धतीने व्याजवसुली करुन कर्जदाराची आर्थिक पिळवणूक (Financial Extortion) करतात. व्याजाचे पैसे देण्यास उशीर झाला तर कुटुंबीयांना देखील त्रास दिला जातो. यामधून शहरात गुन्हे देखील घडले. घेतलेले कर्ज आणि व्याज परत करताना कर्जदाराला तारेवरची कसरत करावी लागत होती. नोकरी आणि उद्योगधंद्यातून मिळालेली रक्कम सावकाराच्या खिशात जात असल्याच्या तक्रारी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांच्या कानावर गेल्या. त्यानंतर त्यांनी अवैध सावकरी करणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारला. (Pune Crime)

पुणे पोलिसांकडून अवैध सावकारी करणाऱ्यांची माहिती देण्यासाठी नागरिकांना हेल्पलाईन क्रमांक 9145003100 उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या क्रमांकावर सुरु असलेल्या व्हॉट्सअॅपवर देखील नागरिक तक्रार करु शकतात. तसेच या क्रमांकाची सोशल मीडियावर (Social Media) प्रसिद्धी केली होती. पुणे पोलिसांनी खासगी सावकारांवर कारवाई करण्यास सुरुवात केल्यानंतर हेल्पलाईन क्रमांकावर 12 पेक्षा अधिक तक्रारी आल्या आहेत.

हेल्पलाईनवर आलेल्या तक्रारींची पोलीस उपायुक्तांमार्फत (DCP) पडताळणी केली जाते.
त्यानंतर अवैध सावकारी करणाऱ्यावर कारवाई (Action) केली जाते.
मागील महिन्यात आलेल्या तक्रारीपैकी 7 सावकारांवर गुन्हे दाखल करुन त्यांना बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत.
या सावकारांविरुद्ध महाराष्ट्र सावकारी कायदा (Maharashtra Lenders Act) कलम व भारतीय दंड विधान कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
तर पुणे ग्रामीणमधील (Pune Rural) एका सावकाराला अटक करुन ग्रामीण पोलिसांच्या (Rural Police) ताब्यात दिले आहे.

 

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथकाकडून (Anti extortion Cell) ही कारवाई सुरु आहे.
अवैध सावकारी करणाऱ्याची माहिती देण्यासाठी उपलब्ध करुन दिलेल्या हेल्पलाईनचा फायदा होत असल्याचे दिसून येत आहे.
पोलिसांकडून होत असलेल्या या कारवाईमुळे खासगी सावकारांचे धाबे दणाणले आहेत.

या कारवाई संदर्भात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले, शहरामध्ये अवैध सावकारी करुन सर्वसामान्यांकडून जास्तीचे व्याज वसूल करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.
त्यासाठी हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करुन दिला आहे.
या क्रमांकावर आलेल्या तक्रारीची पडताळणी करुन खासगी सावकाराविरुद्ध कारवाई केली जात आहे.
ही कारवाई अशीच सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title :-  Pune Crime | crimes against illegal money lenders cp amitabh gupta

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्याच्या बिबवेवाडीत इंजिनिअरकडून एकाचा चाकूने भोकसून खून; कारण समोर आल्यानंतर पोलिसही झाले हैराण

Pune Crime | 50 वर्षीय महिलेचा निर्घृण खून, बारामती तालुक्यातील खळबळजनक घटना

PNB | ‘या’ बँकेच्या खात्यामध्ये ठेवावे लागणार किमान 10 हजार; नाहीतर ग्राहकास 600 रुपये दंड, जाणून घ्या

Leave A Reply

Your email address will not be published.