इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांची हवाई दलाच्या ‘ग्लोबमास्टर’ ने केली  सुटका

0

पुणे : एन पी न्यूज 24 – इराणमध्ये अडकेलेल्या भारतीयांना भारतात आणण्यासाठी गेलेले हवाई दलाचे विमान सी १७ ग्लोबमास्टर हे भारतात परत आले आहे. या विमानातून इराणमधील भारतीयांच्या पहिल्या गटातील ५८ जणांना घेऊन मंगळवारी सकाळी भारतात परतले.

इराणमध्ये सुमारे १ हजार भारतीय अडकून पडले आहेत. त्यातील हॉटेलमध्ये अडकून पडलेल्या पहिल्या गटातील ५८ जणांना हवाई दलाच्या विमानाने भारतात परत आणले आहे. हवाई दलाचे हे खास विमान काल रात्री तेहरानला गेले होते. तेहरानहून ते गाझियाबाद येथील हवाई दलाच्या विमानतळावर आज सकाळी परतले.

Leave A Reply

Your email address will not be published.