IPS अधिकारी होताच हवी होती दुसरी पत्नी, दाखल झाला छळाचा गुन्हा  

IPS officer
15th December 2019

एन पी न्यूज 24 – पत्नीचा छळ केल्याचा आरोप समोर येताच एका प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकाऱ्यास निलंबित करण्यात आले आहे. २८ वर्षीय आयपीएस अधिकारी कोक्कंती महेश्वर रेड्डीवर, घटस्फोटासाठी छळ करत असल्याचा आरोप त्याच्या पत्नीने केला आहे.

रेड्डीची पत्नी बिरूदला भावनाने ऑक्टोबरमध्येच हैद्राबाद पोलीसात आपली तक्रार दाखल केली होती. घटस्फोटासाठी रेड्डी जबरदस्ती करत असल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.

भावनाने म्हटले आहे की, रेड्डी आणि तिचे नाते कॉलेजपासूनचे आहे. ९ फेब्रुवारी २००८ ला दोघांनी विवाह नोंदणी कार्यालयात लग्न केले होते.

रेड्डी आंध्र प्रदेशच्या कडपा जिल्ह्यातील आहे. त्याने याचवर्षी युपीएससी परीक्षेत १२६ वी श्रेणी मिळवली होती. सध्या तो मसुरीच्या लाल बहादूर शास्त्री नॅशनल अ‍ॅकेडमी आणि अ‍ॅडमिनिस्ट्रेशनमध्ये प्रशिक्षण घेत होता.

युपीएससी परीक्षा पास होताच दुसऱ्या महिलेशी लग्न करण्यासाठी रेड्डीने घटस्फोटासाठी आग्रह धरला होता, असा आरोप भावनाने केला आहे. भावना भारतीय रेल्वेत नोकरी करते. तिच्या तक्रारीनंतर हैद्राबाद पोलिसांनी छळ आणि धमकीच्या आरोपाखाली फिर्याद दाखल केली आहे. तसेच एससी, एसटी अ‍ॅक्टसुद्धा लावला आहे. पोलिसांनी सांगितले की, प्रथम दोन्हीकडील लोकांमध्ये वाद मिटवण्याचा आम्ही प्रयत्न केला. यासाठी तीनवेळा बैठक घेतली.

visit : npnews24.com