धक्कादायक! नगरमध्ये चौथीच्या मुलीवर अत्याचार, शाळेबाहेरुन पळवून नेले

0

अहमदनगर : एन पी न्यूज 24 – उत्तरप्रदेश, हैद्राबादमधील बलात्कारांच्या घटनेनंतर देश हादरलेला असताना आता महाराष्ट्रातही अशाच संतापजनक घटना लागोपाठ घडत आहेत. अहमदनगरमधील कोपरगावमधील सुरेगाव येथे चौथीत शिकणाऱ्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिसांनी याप्रकारणी गावातील तरुण अमोल अशोक निमसे यांच्यावर बलात्कार, बालकांच्या लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा, अपहरणाचा गुन्हा नोंदविला आहे.

शुक्रवारी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर पीडित मुलगी शाळेतून बाहेर आली असता तेथे मोटारसायकलवर थांबलेल्या अशोक निमसे याने तिला सांगितले की, तुझ्या वडिलांनी मला तुला घेण्यासाठी पाठविले आहे. मुलीनेही त्याच्यावर विश्वास ठेवला आणि ती त्याच्या मोटरसायकलवर बसली. यानंतर तो तिला अज्ञातस्थळी घेऊन गेला. मुलगी उशीरापर्यंत घरी न आल्याने पालकांनी शोधाशोध सुरू केली होती. पालकांनी तिच्या मैत्रिणींकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, एकजण शाळेच्या बाहेर मोटारसायकल घेऊन आला होता, त्याच्याबरोबर ती गेली.

यानंतर भांबावलेले पालक सर्वत्र मुलीचा शोध घेत होते. रात्रभर पोलीससुद्धा मुलीचा शोध घेत होते. त्यानंतर शनिवारी दुपारी मुलगी गावामध्ये आढळून आली. पोलिसांनी मुलीकडे चौकशी केल्यानंतर पळवून नेणाऱ्या तरुणाने तिच्यावर अत्याचार केल्याचे उघड झाले. यानंतर रात्री अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला. तपासात पोलिसांना आरोपी पीडित मुलीला घेऊन जात असतानाचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. यावरून आरोपीची ओळख पटली असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.
visit : npnews24.com
Leave A Reply

Your email address will not be published.