‘त्या’ दिवशी आम्ही पाकवर हल्ला करण्याच्या तयारीत होतो : माजी वायुसेना प्रमुख बीएस धनुआ

चंडीगढ : एन पी न्यूज 24 – भारतीय वायु सेनेचे माजी प्रमुख बीएस धनुआ यांनी म्हटले आहे की, बालाकोट हल्ला पाकिस्तान व दहशतवादी संघटनांना हे सांगण्यासाठी केला होता की, भारत कोणत्याही दहशतवादी हल्ल्याची किमत चुकवण्यासाठी तयार आहे, आणि शेजारी देशाला हा संदेश प्रभावीपणे समजावला देखील गेला होता. पंजाब सरकार आणि चंदीगड प्रशासनाच्या सैन्य साहित्य महोत्सवाच्या दुसèया दिवशी अंडस्टँडींग मेसेज ऑफ बालाकोट या विषयावर आयोजित चर्चेत धनुआ बोलत होते.
धनुआ म्हणाले, जो संदेश पाकिस्तान आणि दहशतवादी संघटनांना द्यायचा होता तो प्रभावीपणे दिला गेला. परंतु, आमच्याकडून काही मुर्खपणाच्या चुका झाल्या आहेत, ज्यांच्यावर उपाय करण्यात आले आहेत आणि जबाबदार लोकांना शिक्षा करण्यात आली आहे. आम्ही २७ फेब्रुवारी (जेव्हा पाकिस्तानी वायुसेनेने बालाकोट हल्ल्यानंतर तीन दिवसांनी प्रत्युत्तर दिले होते) ला पाकिस्तानी वायुसेनेविरूद्ध महत्वपूर्ण कारवाई करू शकलो नाही.
धनुआ म्हणाले, २७ फेबुवारीला पाकिस्तानी वायुसेनेने भारतीय हद्दीत येण्याचा प्रयत्न केला. यानंतर पाकिस्तानी लष्कर आमच्या निशाण्यावर होते. आम्ही त्यांच्यावर हल्ला करण्याच्या तयार होतो. वायुसेनेच्या निशाण्यावर केवळ सिमेजवळील पाकिस्तानची ठिकाणेच नव्हती तर अन्य परिसराही होता.
visit : npnews24.com