हैद्राबाद बलात्कारप्रकरण : एन्काऊंटरमधील चारही आरोपींचे मृतदेह आजूनही रूग्णालयात

0

हैदराबाद : एन पी न्यूज 24 – तेलंगणाची राजधानी हैद्राबादमधील महिला डॉक्टरवरील सामुहिक बलात्कार आणि हत्याप्रकरणातील आरोपींच्या एन्काऊंटरचा तपास अजूनही सुरू असून एन्काऊंटरमध्ये ठार झालेल्या चारही आरोपींचे मृतदेह १० दिवसांपासून रूग्णालयात पडून आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या एन्काऊंटरचा तपास करण्यासाठी आयोग स्थापन करताना मृतदेहांची विल्हेवाट पुढील आदेशापर्यंत न लावण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे हे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना आता कधी सोपवले जाणार याबाबत अजूनही स्पष्टता नाही.

चारही आरोपींना पोलिसांनी ६ डिसेंबरला चकमकीत ठार केले होते. ज्याठिकाणी २७ वर्षीय महिला डॉक्टरचा मृतदेह सापडला होता, त्याच ठिकाणी हे एन्काऊंटर करण्यात आले होते. या एन्काऊंटरवर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. अनेक संघटनांनी यास फेक एन्काऊंटर म्हटले आहे. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने घटनेच्या दिवशीच चारही मृतदेह १३ डिसेंबरपर्यंत सुरक्षित ठेवण्याचे आदेश दिले होते. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यंत मृतदेह सुरक्षित ठेवण्यास सांगितले. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ६ महिन्याच्या आत अहवाल मागितला आहे.

मृतदेहांची होत आहे तपासणी
सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर विशेष पथक याप्रकरणाचा तपास करत आहे. हे पथक मृतदेह पाहून हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे की, पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी या चौघांवर गोळी चालवली की,  जाणीवपूर्वक यांना मारले. तेलंगणा पोलिसांनी सांगितले की, ६ डिसेंबररोजी चकमकीत हे चौघे मारले गेले. एन्काऊंटरनंतर या चारही आरोपींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

visit : npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.