‘मी पुन्हा येईन’चा त्रास फडणवीसांना पुढची ५ वर्ष होणार : पंकजा मुंडे

Pankaja Munde
15th December 2019

मुंबई : एन पी न्यूज 24 – मी बोललेली नसतानाही मला जनतेच्या मनातली मुख्यमंत्री या वाक्याने गेली ५ वर्ष छळले होते. देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीतही तसच झाले आहे. त्यांच्या मनात काही नसेल, मात्र त्यांच्या मी पुन्हा येईल या कवितेमुळे त्यांना टीकेचे धनी व्हावे लागले आणि पुढची पाच वर्ष त्यांना ते छळणार आहे, असे मत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले आहे.

पंकजा मुंडे यांनी, मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, असे म्हंटल्यानेच पक्षातील एक स्पर्धक या हेतून त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने डावलण्याचा आणि अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, असे बोलले जाते. तसेच पकंजा यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीकाही केली जात होती. दरम्यान राज्यातील भाजपाची सत्ता गेल्यानंतर मी पुन्हा येईन, या फडणवीसांच्या वाक्यावरून त्यांच्यावरही यथेच्छ टीका अनेकांनी सुरू केली. यामध्ये सर्वसामान्यही मागे नव्हते. आजही हे वाक्य प्रसिद्ध असून त्याचा वापर वेळोवेळी केला जात आहे. या दोन्हीचा संदर्भ घेत पंकजा मुंडे यांनी वरील वक्तव्य केल्याचे दिसते.

गोपीनाथ गडावरील पंकजा मुंडेच्या भाषणाने भाजपमध्ये वादळ उठले होते, यावर स्पष्टीकरण देताना पंकजा मुंडे यांनी अनेक गोष्टींवर मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, फडणवीसांच्या किंवा माझ्या मनात त्यावेळी बोलताना तसे काहीच नव्हते. मात्र, आम्हाला त्यावरून टीका सहन करावी लागली. फडणवीसांनाही त्या कवितेचा त्रास होण्याची शक्यता आहे.

पंकजा म्हणाल्या, पराभव झाल्यानंतर मी लगेच तो मान्य केला. माझ्या विरोधात सगळे एकत्र आले हीच माझी शक्ती आहे. मी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातूनच काम करणार आहे. कारण शेवटी काम करण्याचे स्वातंत्रही महत्त्वाचे असते. मी हे काम करणे कसे सोडून देऊ. मला आता काहीच नको. ज्यांचे अस्तित्वच पणाला लागले त्यांच्याविषयी फार अपेक्षा ठेवता येत नाहीत. हा पक्ष मुठभरांचा होऊ नये म्हणून प्रयत्न केले पाहिजेत, असे त्या म्हणाल्या.

visit : npnews24.com