जिल्हाधिकाऱ्यांचे फर्मान, बंदूकीचा परवाना पाहिजे…तर दान करा १० ब्लँकेट

0

ग्वालियर : एन पी न्यूज 24 – मध्य प्रदेशच्या ग्वालियरचे जिल्हाधिकारी अनुराग चौधरी यांनी बंदूकीचा परवाना घेणारांसाठी एक अट घातली आहे. त्यांची ही अट ऐकून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. शनिवारी जिल्हाधिकारी अनुराग चौधरी यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, जर कोणाला बंदूकीचा परवाना हावा असेल तर त्याने कमीत कमी १० ब्लँकेट गोशाळेत दान कराव्यात.

शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी अनुराग चौधरी यांनी गोसेवक आणि समाजसेवकांच्या बैठकीत हे फर्मान सुनावले. परंतु, बंदुकीचा परवाना पाहिजे असणारांना अशी अट घालण्याची ही त्यांची पहिलीच वेळ नाही. यापूर्वी सुद्धा त्यांनी परवाना पाहिजे असेल तर १० झाडे लावा, अशी अट घातली होती.

ग्वालियर, भिंड, मुरेना आदि ग्वालियरच्या परिसरात बंदूक बाळगणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते. यासाठी मध्य प्रदेशमध्ये सर्वात जास्त शस्त्र परवाने या भागात दिले जातात. लोकांच्या याच आकर्षणास जिल्हाधिकारी अनुराग चौधरी यांनी समाजसेवेशी जोडले आहे. त्यांच्या या नव्या अटीचा उल्लेख त्यांच्या अधिकृत कलेक्टर ग्वालियर ट्विटर हँडलवरून करण्यात आला आहे.

visit : npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.