येथे साडी खरेदी केल्यास मोफत मिळतात १ किलो कांदे!

0

ठाणे : एन पी न्यूज 24 – एका कापडाच्या दुकानात खरेदी केल्यानंतर एक किलो कांदे मोफत दिले जात आहेत. हे दुकान अन्य राज्यातील नसून आपल्याच महाराष्ट्रातील ठाणे येथील आहे. एक हजार रूपयांच्या वस्तूंच्या खरेदीवर ग्राहकांना एक किेलो कांदे दिले जात असल्याचे दुकानाच्या मालकाने सांगितले. ही योजना सुरू केल्यानंतर ग्राहकांची संख्या वाढली आहे, असेही ते म्हणाले.

मागील काही आठवड्यांपासून सर्वच बाजारांमध्ये कांद्याचे दर १०० रूपये किलोपर्यंत गेले आहेत. या दुकानातील एका कर्मचाऱ्याने सांगितले की, उल्हासनगरमधील शीतल हँडलूम या आमच्या दुकानात साडीच्या खरेदीवर एक किलो कांदे मोफत देण्याची योजना सुरू केल्यानंतर शनिवारी दुकानात गर्दी वाढली होती.

दुकानाच्या मालकाने सांगितले की, आमच्या बाजारात कांदे १३० रूपये किलोने विकले जात आहेत. यासाठी १,००० रुपयांच्या कापड खरेदीवर एक किलो कांदे मोफत देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

visit : npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.