उद्धव ठाकरेंनी साथ सोडली ‘हा’ सर्वात मोठा अपेक्षाभंग : देवेंद्र फडणवीस

0

मुंबई : एन पी न्यूज 24 – विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी भाजपाची साथ सोडली हा भाजपाचा सर्वात मोठा अपेक्षाभंग होता, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

फडणवीस म्हणाले, विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५ जागा मिळाल्या. १६४ पैकी १३० जागा येतील असे वाटत असताना १०५ जागा आम्हाला मिळाल्या. जनतेने जनादेश आम्हाला दिला, मात्र शिवसेनेने फारकत घेतली आणि मोडतोड करुन सरकार स्थापन केले. शिवसेना जे काही वागली त्याला काहीही अर्थ नव्हता. जनादेश आमच्याजवळ होता, पण मित्रपक्षाने जनादेशाचा विश्वासघात केल्याने आम्हाला विरोधात बसावे लागले, असे फडणवीसांनी म्हटले.
visit : npnews24.com
Leave A Reply

Your email address will not be published.