कारगिल युद्धावेळी इतर देशांनी भारताला लुबाडले; तत्कालीन लष्करप्रमुखांचा खुलासा

0

चंदीगड : एन पी न्यूज 24 – कारगिल युद्धाच्या प्रसंगी भारताला मोठ्या प्रमाणात विदेशातून शस्त्रसाठा, दारुगोळा मागवावा लागला होता. त्यावेळी इतर देशांनी मदत करण्याऐवजी भारताकडून प्रचंड पैसा उकळला आणि तीन वर्ष जुने सॅटेलाइट फोटो भारताला दिले होते, असा धक्कादायक खुलासा भारतीय लष्कराचे तत्कालीन प्रमुख जनरल व्ही.पी. मलिक यांनी मेक इन इंडियाच्या कार्यक्रमात बोलताना केला आहे.

मलिक म्हणाले की, कारगिलचे युद्ध सुरू असताना इतर देशांकडून भारताने शस्त्रसाठा आणि दारुगोळ्याची मागणी केली असता या देशांनी भारताला मदतीच्या नावावर जुनी शस्त्र दिली. भारताचे शोषण करण्याचा प्रयत्न या देशांनी केला. एका देशाकडून तोफा मागितल्या होत्या. त्या देशाने मदतीचे अश्वासन दिले पण नंतर जुन्या तोफांची दुरुस्ती करुन त्या पाठविल्या. याचवेळी दारुगोळ्यासाठी भारताने अन्य एका देशाची संपर्क साधला असता त्यांनी १९७० च्या दशकातील दारुगोळा भारताला दिला होता. यावेळी सॅटेलाइट फोटोसाठी भारताला प्रत्येकी छत्तीस हजार रुपये मोजावे लागले होते. एवढे पैसे देऊनही तीन वर्ष जुने सॅटेलाइट फोटो दिले गेले, असा धक्कादायक खुलासा जनरल व्ही.पी. मलिक यांनी केला आहे.

visit : npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.