NRI पती म्हणाला, लवकरच देईन सरप्राईज…पाठवले तलाकचे पेपर

0

चंदीगड : एन पी न्यूज 24 – पळपुट्या एनआरआय नवरोबांना अद्दल घडविण्यासाठी अमृतपाल कौर ही एक सामान्य महिला पासपोर्ट ऑफिसमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करत आहे. तिच्यावर जो प्रसंग आला आहे तो अन्य कुणावरही येऊ नये अशी तिची इच्छा आहे. आता अनेक महिला तिच्यासोबत काम करत आहे. एनआरआय पतीकडून फसवणूक झाल्यानंतर अमृतपाल कौरने इतर महिलांना मदत करण्याचे ठरविले आहे.

NRI पति ने कहा, जल्द दूंगा सरप्राइज, भेज दिए तलाक के पेपर

यासाठी अमृतापाल कौर व अन्य महिलांना पासपोर्ट कार्यालयाकडूनही सहकार्य मिळत आहे. अमृतापालची कथा ऐकून फसवणूक झालेल्या अनेक महिला तिच्याकडे येऊन मदत मागत आहेत, असे चंदीगड शहरातील प्रादेशीक पासपोर्ट ऑफिसचे प्रमुख सिबास कबिराज यांनी सांगितले.

NRI पति ने कहा, जल्द दूंगा सरप्राइज, भेज दिए तलाक के पेपर

कबिराज यांनी सांगितले की, पत्नीची फसवणूक करणाऱ्या भारतीय एनआरआय पतीचा पासपोर्ट रद्द करण्याची भारतीय कायद्यात तरतूद आहे. यासाठी पासपोर्ट ऑफिसला केंद्राची परवानगी आवश्यक असते. पासपोर्टधारकाने कोणती माहिती लपविली, त्याच्याविरोधात कोर्टाचे समन्स जारी झाले आहे का, आदी पुरावे गोळा करावे लागतात. हे सर्व पासपोर्ट रद्द करण्यासाठी करावे लागते.

NRI पति ने कहा, जल्द दूंगा सरप्राइज, भेज दिए तलाक के पेपर

कबिराज यांनी एनआरआय पतीकडून फसवणूक झालेल्या पीडित महिलांना पासपोर्ट कायद्याची माहिती दिली आणि त्यांना संगणक व आवश्यक त्या सामानासह एक खोली दिली आहे. त्यांनी या महिलांना सांगितले की, सर्व कागदपत्र पूर्ण केली तर ते त्यावर सही करतील. हा परदेशात बसलेल्या पतीकडून न्याय मिळवण्याचा सर्वात योग्य पर्याय आहे.

NRI पति ने कहा, जल्द दूंगा सरप्राइज, भेज दिए तलाक के पेपर

कबिराज यांनी सांगितले की, या महिलांनी एकत्र येत तब्बल ४०० पासपोर्ट रद्द केले आहेत. परराष्ट्र मंत्रालयात पळपुट्या नवरोबांच्याविरोधात ५००० पेक्षा जास्त महिलांनी तक्रार दाखल केली आहे. कबिराज सांगतात, त्यांच्या कार्यालयात बसून या महिलांनी अनेक देशात लपून बसलेल्या आपल्या भारतीय पतीच्या मनात भिती निर्माण केली आहे.

NRI पति ने कहा, जल्द दूंगा सरप्राइज, भेज दिए तलाक के पेपर

या महिला सांगतात की, विवाहाच्या वेळी मुलाकडचे मुलींकडून हजारो डॉलर्स हुंडा घेतात. आणि त्यापैशाने परदेशात जाऊन आपले बस्तान बसवतात. आणि पत्नी, मुलांना येथेच सोडतात.

NRI पति ने कहा, जल्द दूंगा सरप्राइज, भेज दिए तलाक के पेपर

पासपोर्ट ऑफिसमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करणारी रीना मेहला २४ वर्षांची असताना तिचे लग्न झाले. पाच वर्षांनंतर तिच्या पतीने भारतातील दुसऱ्या शहरात जादा काम करण्यासाठी जात असल्याचे सांगून अमेरिकत पळ काढला. तिचा पती राहुल कुमार सध्या अमेरिकेच्या ब्रॉन्क्स शहरात राहत आहे.

NRI पति ने कहा, जल्द दूंगा सरप्राइज, भेज दिए तलाक के पेपर

रीना ने फेसबुक वर सर्च करून शेवटी पतीचा शोध घेतला. नंतर तिने परराष्ट्र मंत्रालय आणि अमेरिकी दुतावासाला पत्र लिहून पतीचा पासपोर्ट रिवोक केला. सध्या, अमेरिकन कोर्टात तिच्या पतीच्या केसचा निर्णय होणार आहे. रीना म्हणते ती अजूनही तिच्या पतीवर तेवढेच प्रेम करते. रीना ही अमृतपाल कौरसोबत राहाते.

NRI पति ने कहा, जल्द दूंगा सरप्राइज, भेज दिए तलाक के पेपर

अमृतपाल कौर सांगते की, लग्नाच्या तीन दिवसानंतर तिचा पती १४००० डॉलर्स मागू लागला. तिचा पती कुलप्रीत तिच्याकडे इंग्लडची तिची दोन वर्षांची कमाईसुद्धा मागत होता. लग्नाच्या दोन आठवड्यानंतर कुलप्रीत ऑस्ट्रलियाला गेला. काही महिन्यानंतर त्याने अमृतपालला सांगितले की, तो लवकरच एक सरप्राईज देणार आहे. यामुळे ती खुपच उत्साहित झाली होती. ती एवढी उत्साहित झाली की तिने पतीसाठी एक महागडी हिऱ्याची अंगठीसुद्धा ऑर्डर केली. परंतु, तिचा हा आनंद जास्त काळ टिकला नाही. कारण काही दिवसातच तिच्याकडे तलाकचे पेपर पतीने पाठवले. अशाप्रकारे अनेक महिलांची फसगत झाली असून त्यांना अमृतापल कौर आणि चंदीगडचे पासपोर्ट कार्यालय सहकार्य करत आहे.

visit : npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.