पक्ष सोडण्याच्या वावड्या उठल्यामुळे मी अस्वस्थ झाले : पंकजा मुंडे

0

मुंबई : एन पी न्यूज 24 – भाजपाच्या नाराज नेत्या पंकजा मुंडे यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर आयोजित मेळाव्यात पक्षनेतृत्वावर जाहीरपणे केलेल्या टीकेनंतर राज्यातील भाजपामध्ये अस्वस्था निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर अनेक हालचाली झाल्यानंतर खडसे, मुंडे या दोन्ही नेत्यांना कारवाईचाही इशारा देण्यात आला. यामुळेच की काय, आता पंकजा मुंडे यांनी नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसत आहे.

एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे की, मी फेसबुकवर पोस्ट लिहिली, त्यामागे कोणतीही अस्वस्थता नव्हती. मी नाराज नव्हते, अस्वस्थ नव्हते. माझ्या मनात खदखद नव्हती. परंतु, १ डिसेंबर ते १२ डिसेंबर ज्या-ज्या वावड्या उठल्या त्यामुळे मी अस्वस्थ झाले होते. मी पॉवरगेम खेळते, मला विरोधी पक्षनेते पद हवे, अशाही चर्चा रंगल्या होत्या. त्या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी मी कोअर कमिटीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची घोषणा केली.

पंकजा मुंडे यांनी पुढे म्हटले की, मी भाजपा सोडणार नाही, पराभव झाल्याने मी खचून गेलेली नाही. माझ्याबद्दल ज्या वावड्या उठल्या त्यामुळेच मी कोअर कमिटीमध्ये न राहण्याचा निर्णय घेतला. मी हे पद स्वतःसाठी सोडले आहे. तर भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना त्या म्हणाल्या, खडसे यांचे मंत्रिपद गेले त्यावेळी मी व्यक्त झाले होते. त्यांना तिकिट मिळाले नाही याचेही मला वाईट वाटले. पण कधी-कधी पक्षाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. एकनाथ खडसे यांच्याबाबत जे घडले त्यास मी न्याय-अन्यायाच्या तराजूत तोलणार नाही. मात्र एखाद्या व्यक्तीला सतत डावलले जात असतातना त्या व्यक्तीने किती सहनशक्ती ठेवावी यास मर्यादा असू शकतात.

visit : npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.