एलपीजी गॅस ग्राहकांसाठी नवी सुविधा, कार्डाद्वारे घरातून होतील सर्व कामे

0

डेहरादून : एन पी न्यूज 24 – हिंदुस्थान पेट्रेलियम कंपनीच्या गॅस ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. आता स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर घेण्यासाठी ग्राहकांना गॅस एजन्सीच्या पायऱ्या झिजवाव्या लागणार नाहीत. तसेच रोख रक्कम भरण्याच्या कटकटीतूनही दिलासा मिळणार आहे. लवकरच सिलिंडर ग्राहकाच्या घरी पोहचवण्यासाठी ईझी गॅस कार्डचा वापर सुरू होणार आहे.

एचपी कंपनीने या सुविधेची सुरूवात डेहरादून येथून केली आहे. गुरूवारी कंपनीने जीएमएस रोडवरील एका हॉटेलमध्ये एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत ईझी कार्ड कंपनीचे चंदन झा आणि मोसंबी स्वाईप मशीन कंपनीचे चौधरी यांनी गॅस एजन्सी चालकांना ईझी कार्डच्या वापराचे प्रशिक्षण दिले.

यावेळी सांगण्यात आले की, ग्राहकांना गॅस डिलिव्हरीच्या वेळी एक पैसाही जास्त भरावा लागणार नाही. यासाठी कार्ड पद्धत सुरू करण्यात येत आहे. कर्मचाऱ्याचा मोबाईल जीपीएसशी जोडलेला असेल. याबैठकीला १८ गॅस एजन्सीचे चालक उपस्थित होते.

यावेळी एचपीचे व्यवस्थापक अमित कुमार म्हणाले, नोंदणी करूनही गॅस न मिळाल्याची तक्रार अनेक ग्राहक करत असतात, परंतु, कार्ड पद्धतीमुळे ही समस्या दूर होणार आहे. कर्मचाऱ्याचा मोबाईल जीपीएसशी जोडलेला असल्याने त्याने सिलिंडर कुठे आणि केव्हा दिला याची माहिती मिळणार आहे.

असे काम करणार कार्ड
ईझी गॅस कार्डने बुकिंग केल्यानंतर एजन्सीचा कर्मचारी सिलिंडर घेऊन ग्राहकाच्या घरी पोहचेल. या कर्मचाऱ्याजवळ स्मार्टफोन असेल, जो स्वाईप मशीनशी जोडलेला असेल. ग्राहक रोख रकमेसह डेबिट आणि क्रेडिट कार्डने पैसे भरता येतील. यानंतर एजन्सीकडून मोबाईलवर एक मेसेज येईल. यात परिसरातील कोणत्या ग्राहकाल सिलिंडर दिला, याची माहिती असेल.

visit : npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.