खडसेंच्या ‘क्लीन चिट’ला अंजली दमानियांचे आव्हान! अडचणी वाढणार

0

पुणे : एन पी न्यूज 24 – भोसरीतील जमीन खरेदी प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना क्लीन चिट दिली होती. परंतु, या क्लीन चिटला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आव्हान दिले आहे. याप्रकरणी एकनाथ खडसे यांच्याविरोधात अंजली दमानिया यांच्यावतीने अ‍ॅड. असीम सरोदे यांनी दाखल केलेला त्रयस्थ अर्जदाराचा हस्तक्षेप अर्ज कोर्टाने मंजूर केला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी ९ जानेवारीला होणार आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मे २०१८ मध्ये भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणी एकनाथ खडसेंवर आरोप सिद्ध न झाल्याचा अंतिम अहवाल कोर्टात सादर केला होता. जमीन खरेदी प्रकरणात खडसेंमुळे सरकारचे नुकसान झाल्याचा आरोप सिद्ध झाला नाही, असे या अहवालात नमूद करण्यात आले होते. यानंतर, अंजली दमानिया यांनी पुणे सेशन कोर्टात अर्ज केला होता. त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील निकालाचा दाखला देत आव्हान दिले होते. खडसे यांनी पदाचा गैरवापर करत जमीन पत्नी आणि जावयाच्या नावे विकत घेतल्याचा आरोप आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांचा व्यवहार एका दिवसांत झाला असून, याबाबतचे पुरावे दिल्याचे वकिलांनी कोर्टात सांगितले.

visit : npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.