PNBकडून कोट्यवधी ग्राहकांना भेट, घर-कार कर्जावर मिळणार ‘या’ सुविधा

0

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – जर तुम्ही या महिन्यात घर अथवा कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खास संधी आहे. पंजाब नॅशनल बँक या सरकारी बँकेने आपल्या ग्राहकांसाठी घर आणि कार खरेदीच्या कर्जावर  फेस्टिव्हल बोनान्जा ऑफर सुरू केली आहे.

मॉर्गेज लोनवर सूट
पीएनबीने सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार झिरो प्रोसेसिंग फी वर घर आणि कारसाठी कर्ज घेऊ शकता. तसेच मॉर्गेज लोनवर ५० टक्के सूट दिली जात आहे. मॉर्गेज लोन साठी स्थिर संपत्ती बँकेकडे गहान ठेवली जाते. मॉर्गेज लोनची रक्कम संपत्तीची स्थिती आणि बँकेच्या लोन पॉलिसीवर आवलंबून असते.

कर्ज देताना बँका डॉक्युमेंटेशन अथवा प्रोसेसिंग फी म्हणून मोठी रक्कम घेतात. काही बँका कर्जाच्या रक्कमेच्या एक टक्का एवढी रक्कम घेतात. म्हणून जर तुम्ही घर अथवा कारसाठी कर्ज घेणार असाल तर तुमच्यासाठी पीएनबीची ही ऑफर योग्य ठरू शकते.

visit : npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.