शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, प्रिय बाबा…

Sharad Pawar
12th December 2019

मुंबई : एन पी न्यूज 24 – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस असून ते ८० व्या वर्षात पदार्पण करत आहेत. यानिमित्त पवार यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही एक भावनिक ट्विट करत वडीलांना शुभेच्छा दिल्या आहेत.

या ट्विटमध्ये सुळे यांनी म्हटले आहे की, प्रिय बाबा, तुम्ही आमच्यासाठी अखंड उर्जेचा स्रोत आहात. तुम्ही आम्हाला विचारांचा उज्ज्वल वारसा दिला आणि त्यानुसार मार्गक्रमण करण्याचं बळ देखील…बाबा, तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा. तुम्हाला निरोगी असे दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा.

राज्य आणि देशाच्या राजकारणात आपल्या कर्तुत्वाने सातत्याने राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या शरद पवार यांचा आजचा वाढदिवस कृतज्ञता दिन म्हणून साजरा केला जात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे. शरद पवार आज दुपारी १ वाजेपर्यंत मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये कार्यकर्त्यांना भेटणार आहेत.

visit : npnews24.com