अयोध्याप्रकरणी पुन्हा सुनावणी नाही, SC ने सर्व १८ पुनर्विचार याचिका फेटाळल्या

0

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – अयोध्या प्रकरणाच्या पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज निर्णय देत यासंबंधी दाखल सर्व १८ याचिका फेटाळल्या आहेत. सरन्यायाधीश एस ए बोबडे यांच्या ५ न्यायमूर्तीच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे हे स्पष्ट झाले आहे की, अयोध्या खटल्याचा ९ नोव्हेंबररोजी जो निकाल न्यायाल्याने दिला होता, त्यावर पुन्हा सुनावणी होणार नाही.

सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर जमियत उलेमा हिन्दचे अध्यक्ष मौलाना अरशद मदनी यांनी म्हटले की, पुनर्विचार याचिका फेटाळल्याची आम्हाला खंत वाटते. प्रथम मशीद योग्य ठिकाणी उभारण्यात आली आहे, असे म्हटले गेले, हेदेखील मान्य करण्यात आले की, ज्यांनी मशीद पाडली ते गुन्हेगार आहेत. आणि नंतर त्याच लोकांच्या बाजूने निकाल दिला गेला. आम्हाला वाटले होते की, न्यायालय पुनर्विचार करेल, म्हणून याचिका दाखल