राष्ट्रवादीने पुतण्या फोडल्याने गोपीनाथ मुंडे व्यथित होते :  महादेव जानकर

0

मुंबई : एन पी न्यूज 24 – आयुष्यभर गोपीनाथ मुंडे यांनी राष्ट्रवादी आणि शरद पवारांना विरोध केला. मुख्य शत्रुपक्ष राष्ट्रवादीच असल्याप्रमाणे त्यांनी संघर्ष केला. त्यातच पुतण्या फोडल्यामुळे गोपीनाथ मुंडे व्यथित झाले होते. त्यामुळे हा राग अजुनच वाढला होता. मात्र, वडिलांचा वसा पुढे चालवणाऱ्या पंकजा मुंडे यांनी वेळोवेळी राष्ट्रवादीला टार्गेट केले. राष्ट्रवादीचे दोन उमेदवार फोडण्याची किमया पंकजा त्यांनी करून दाखवली, असे वक्तव्य महादेव जानकर यांनी केले आहे.

जानकर हे पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय आणि मानलेले बंधू आहेत. आज लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त गोपीनाथ गडावर अयोजित मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमात पंकजा यांनी राष्ट्रवादी किंवा सत्ताधारी पक्षाकडे पाठ करत थेट भाजप नेतृत्वावरच हल्ला चढवला तर जानकर यांनी मात्र राष्ट्रवादीकडे आपला मोर्चा वळवला होता. जानकर यांनी पंकजा यांच्या पाठिंशी ठाम असल्याचे सांगितले. आपण बारामतीची पालखी वाहणार नसल्याचे म्हणत त्यांनी पवारांवर टिका केली.

visit : npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.