फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी शेवटपर्यंत झटले : पंकजा मुंडे

0

बीड : एन पी न्यूज 24 – देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी शेवटपर्यंत झटले. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पाच वाजेपर्यंत भाजपाचा एकेक आमदार निवडून येईल यासाठी प्रचार केला, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी फडणवीस यांना आज सुनावले. पंकजा मुंडे या मागील काही दिवसांपासून पक्षनेतृत्वावर नाराज असून त्यांनी मनातील खदखद आज जाहीरपणे व्यक्त केली. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर आयोजित मेळाव्यात त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमात राज्यातील पक्षनेतृत्वावर आपला रोष व्यक्त करताना पंकजा मुंडे म्हणाल्या, निवडणुकीच्या आधीच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरलेला होता. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी मी प्रयत्न करत होते. एकेक आमदार पक्षाला देण्यासाठी वणवण फिरत होते. मी प्रत्येक क्षणी पक्षाची सेवा केली. पराभव झाल्यानंतरही प्रत्येक बैठकीला उपस्थित राहिले. सत्तास्थापनेसाठी जे काही करता येईल ते केले. एक मैं ही हूं, समझी नहीं खुद को आज तक, एक दुनिया ही है, की न जाने मुझे क्या क्या समझ रही है, असे म्हणत त्यांनी पक्षावरील आपली नाराजी व्यक्त केली.

visit : npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.