ऑपरेशन थिएटरमध्ये अश्लील गाण्यावर डान्स, बनवला ‘टिक टॉक’ व्हिडिओ

0

आरा : एन पी न्यूज 24 –  बिहारमधील आरा जिल्ह्यातील सरकारी रूग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये काहीजण अश्लील गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. ज्या गाण्यावर डान्स चित्रित करण्यात आला आहे ते गाणे अतिशय अश्लील आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रूग्णालय प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. हा व्हिडिओ केव्हा आणि कोणत्या दिवशी तयार करण्यात आला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ऑपरेशन थियेटर में अश्लील गानों पर कर रहे थे डांस, बना रहे थे टिक टॉक वीडियो
या टिक टॉक व्हिडिओत काही युवक भोजपुरी अश्लील गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. डान्स करणारे युवक रूग्णालयाचे कर्मचारी आहेत, की अन्य कुणी, हे समजलेले नाही. ज्या ऑपरेशन थिएटरमध्ये हा टिक टॉक व्हिडिओ बनविण्यात आला आहे तो रूग्णालयाचा आपत्कालिन वार्ड आहे. ज्या ठिकाणी चोवीस तास रूग्णांना सेवा दिली जाते.

ऑपरेशन थियेटर में अश्लील गानों पर कर रहे थे डांस, बना रहे थे टिक टॉक वीडियो

रूग्णालय प्रशासनाने यातील दोषींवर सक्त कारवाई करण्यात येईल, असे म्हटले आहे. ऑपरेशन थिएटर आणि इमर्जन्सी वॉर्डमध्ये तीन शिप्टमध्ये डॉक्टर, कंपाऊंडर, ड्रेसर, एएनएम, जीएनएम व वॉर्डबॉय कामावर असतात. तसेच मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक तैनात केलेले असतात. यामुळे व्हिडिओ प्रकरणानंतर येथील सुरक्षेवरही प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, येथील स्थानिक लोकांनी सांगितले की, असे प्रकार येथे नेहमी होत असतात. येथे साप, वचूसुद्धा यापूर्वी आढळलेले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना येथे नाही.

ऑपरेशन थियेटर में अश्लील गानों पर कर रहे थे डांस, बना रहे थे टिक टॉक वीडियो

आरा रूग्णालयाचे सिव्हील सर्जन ललितेश्वर प्रसाद झा यांनी व्हिडिओबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे म्हटले आहे. मात्र, दोषींवर कारवाई करण्याचे अश्वासन त्यांनी दिले आहे.

ऑपरेशन थियेटर में अश्लील गानों पर कर रहे थे डांस, बना रहे थे टिक टॉक वीडियो

ऑपरेशन थियेटर में अश्लील गानों पर कर रहे थे डांस, बना रहे थे टिक टॉक वीडियो

ऑपरेशन थियेटर में अश्लील गानों पर कर रहे थे डांस, बना रहे थे टिक टॉक वीडियो

ऑपरेशन थियेटर में अश्लील गानों पर कर रहे थे डांस, बना रहे थे टिक टॉक वीडियो

visit : npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.