CAB : आशिष शेलारांनी शिवसेनेला म्हटले… ‘काँग्रेसचे हमाल दे धमाल’

0

मुंबई : एन पी न्यूज 24 – ज्या विधेयकावरून सध्या देशात गदारोळ सुरू आहे ते नागरिकत्व विधेयक काल राज्यसभेत मतदानासाठी आले असताना शिवसेनेच्या खासदारांनी सभात्याग केला होता. यावरून दोन वेगवेगळी ट्विट करत भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. रोज नवे युटर्न..सत्तेसाठी पहा कशी कमाल..काँग्रेसचे हमाल दे धमाल! असे ट्विट शेलार यांनी केले आहे.

शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, देशातील तमाम हिंदूसाठी हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आपला मतदानाचा हक्क गमावला होता. त्यांची सेना आज या देशात येणारे आणि इथे आलेल्या हिंदुंना मतदानाचा हक्क नको? अशी भूमिका नागरिकत्व सुधारणा विधेयकावर घेते. रोज नवे युटर्न..सत्तेसाठी पहा कशी कमाल..काँग्रेसचे हमाल दे धमाल!, असे शेलार यांनी म्हटले आहे.

तर दुसऱ्या ट्विटमध्ये शेलार यांनी म्हटले आहे की, भाजपामुळे जगभारतील हिंदूंना भारत हे आश्रयस्थान झाले आहे. काहींचा विरोध होता. काहीजण विरोधी मतदान करुन सभागृहात बसले. काहीजण जनपथला घाबरुन सभागृहातून पळाले..? आणि फसले! शेलार यांनी शिवसेनेवर केलेल्या या टिकेनंतर शिवसेना कोणते उत्तर देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

visit : npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.