भाजपा माझ्या बापाचा पक्ष, तो पुन्हा मूठभर लोकांचा करू नका; पंकजा मुंडेंचा पक्ष नेतृत्वावर घणाघात

0

बीड : एन पी न्यूज 24 – भाजपा हा माझा पक्ष आहे. काही जण म्हणतात बापाचं घर, बापाची जमीन, तसा हा माझ्या बापाचा पक्ष आहे. गोपीनाथ मुंडेंनी संघर्ष करून मूठभर लोकांचा पक्ष जनसामान्यांपर्यंत पोहोचवला. तो पक्ष आपण रिव्हर्स गिअरमध्ये नेऊ नये एवढीच विनंती. मला तो पक्ष परत पाहिजे, असे म्हणत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी पक्षाच्या नेतृत्वावर सडकून टीका केली. दिवंगत नेते गोपीनथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर आयोजित मेळाव्यात समर्थकांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

पक्षावर नाराज असलेल्या पंकजा मुंडे आज मोठी घोषणा करतील असे म्हटले जात होते. तसेच त्या पक्ष सोडणार अशीही चर्चा होती. मात्र, भाजप माझ्या बापाचा पक्ष आहे, मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही. गोपीनाथ मुंडेंच्या रक्तात बेईमानी नाही, असे म्हणत त्यांनी पक्ष सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. पंकजा मुंडे म्हणाल्या, पक्ष ही प्रक्रिया असते. त्यावर कुणाचीही मालकी नसते. पक्ष एका व्यक्तीचा नाही. अटल बिहारी वाजपेयी, राजनाथ सिंह, नितीन गडकरी आणि आता अमित शहा यांच्यासारख्यांनी भाजपाचे अध्यक्षपद भूषवले आहे.

यावेळी त्यांनी मला कोअर कमिटीतून मुक्त करा, असे आवाहन पक्षाला करताना म्हटले की, मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही, पण मला कोणतेही पद मिळू नये म्हणून कुणी प्रयत्न करत आहे का? पक्ष कोणाच्या मालकीचा नसतो. मला कोअर कमिटीतून मुक्त करा, लोकशाही मार्गाने तिथे काही होत नसेल, तर त्या ठिकाणी राहण्यात अर्थ काय, असे पंकजा म्हणाल्या.

visit : npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.