हैद्राबाद सामुहिक बलात्कारानंतर १.३ लाख महिलांनी डाऊनलोड केले हे ‘अ‍ॅप’

Hyderabad gang rape
12th December 2019

बंगळुरू : एन पी न्यूज 24 – हैद्राबादमध्ये एका महिला डॉक्टरवर झालेला सामुहिक बलात्कार आणि हत्येमुळे देशभरात संताप व्यक्त करण्यात येत होता. शिवाय, महिलांमध्येही असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. ही अमानुष घटना घडल्यानंतर येथील अवघ्या काही दिवसात १.३ लाख महिलांनी सुरक्षेसाठी एक विशेष अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड केले आहे. या अ‍ॅपचे नाव सुरक्षा (SURAKSHA-Bengaluru City Police) असून ते बंगळुरू पोलिसांनी सुरू केले आहे. या अ‍ॅपचा आकार ५.८ एमबी आहे.

बंगळुरूचे पोलीस उपायुक्त कुलदीप यांनी सांगितले की, हैद्राबादच्या घटनेनंतर अतिशय मोठ्याप्रमाणात हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यात आले आहे. या अ‍ॅपबाबत पोलिसांनी दावा केला आहे की, सुरक्षा अ‍ॅपवर केवळ सात सेकंदात पोलीस प्रतिसाद देतात. यासाठी शहरातील सर्व पोलीस ठाण्यात दोन पेट्रोलिंलग वाहने तैनात करण्यात आली आहेत. अ‍ॅपवर फोन येताच ताबडतोब कारवाई करण्यात येईल.


कुणीही करू शकतात वापर
सुरक्षा अ‍ॅपचा वापर महिला, पुरूष कुणीही करू शकतात. या अ‍ॅपसाठी नाव आणि मोबाईल क्रमांकासह नोंदणी करावी लागते. त्यानंतर ओटीपी व्हेरिफाय करावा लागेल. यानंतर इमर्जन्सी क्रमांक सेव्ह करावा लागेल, ज्याद्वारे सकंटकाळात तुमच्या कुटुंबियांशी संपर्क साधला जाईल.

संकटकाळात एसओएस लाल बटन दाबावे लागेल. तर रद्द करण्यासाठी एसओएस हिरवे बटन दाबावे लागेल. या अ‍ॅपद्वारे दहा सेकंदाचा व्हिडिओसुद्धा पोलिसांना पाठवता येईल. संकटकालिन बटन सुरू करण्यासाठी पॉवरचे बटन लागोपाठ पाचवेळा दाबावे लागेल. या अ‍ॅपवर जीपीएस सुविधा असल्याने पोलिसांना घटनास्थळ समजू शकते

visit : npnews24.com.