लाचखोर भाजप नगरसेविकाला ५ वर्षांचा कारावास! कोर्टाने ठोठावली शिक्षा

bjp-corporatoer
11th December 2019

मुंबई : एन पी न्यूज 24 – मीरा भाईंदर महापालिकेतील भाजपाची लाचखोर नगरसेविका वर्षा गिरीधर भानुशाली हिला २०१४ सालातील लाच प्रकरणात ठाणे न्यायालयाने ५ वर्ष कैद आणि ५ लाख दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास आणखी ६ महिन्याचा कारावास भोगावा लागणार आहे.

बेकायदेशिरपणे एका गाळ्याची उंची वाढवण्यासाठी नगरसेविका वर्षा भानुशाली हिने १ लाख ६० हजार रुपयांची लाच मागितली होती. या लाचेच्या रकमेपैकी पहिला ५० हजार रुपयांचा हप्ता स्वीकरताना ६ जून २०१४ रोजी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून वर्षा भानुशाली हिला तिच्या भाईंदरच्या मॅक्सस मॉल समोरील जानकी हेरिटेज इमारतीतील राहत्या घरात रंगेहाथ पकडले होते. वर्षा भानुशाली २००७ सालच्या महापालिका निवडणूकीत निवडून आली होती.