‘निर्भया’चे गुन्हेगार ज्या दिवशी दुष्कर्म केले त्याच तारखेला फासावर लटकणार?

0

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – निर्भया सामूहिक बलात्कारप्रकरण दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ ला घडले होते. यातील चार दोषींना याच दिवशी म्हणजे १६ डिसेंबरला फाशी देण्यात येऊ शकते, अशी शक्यता वर्तविली जात आहे. असे झाले तर निर्भयाला तब्बल सात वर्षानंतर न्याय मिळू शकतो. मात्र, या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

आरोपी पवन गुप्ता याची मंडोली तुरुंगातून दिल्लीच्या तिहार तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. तिहारमध्ये फाशीची ट्रायल सुद्धा घेतली गेल्याचे समजते. याप्रकरणी मुकेश सिंह, विनय शर्मा, पवन गुप्ता आणि अक्षय कुमार ठाकूर या चौघांना फाशी देण्याची शक्यता आहे. आरोपी विनय शर्माने फाशीपासून सूट मिळावी म्हणून दया याचिका दाखल केली होती. ही याचिका गृह मंत्रालयाने राष्ट्रपतींकडे पाठवली होती. राष्ट्रपतींनी ही दयेची याचिका फेटाळली आहे.

visit : npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.