मोदींना घेरण्यासाठी पवारांचा नवा प्लॅन यशस्वी होणार का? हा आहे अडथळा

Pawar
10th December 2019

मुंबई : एन पी न्यूज 24 – देशभरात मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाचा चौखुर उधळलेला वारू महाराष्ट्रात अडविण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना यश आले आहे. राज्यातील या यशानंतर देशभरात हा प्रयोग करण्यास पवार उत्सुक असल्याचे दिसत आहेत मात्र, देशपातळीवर सर्व विरोधीपक्ष एकत्र येण्याबाबत पवार साशंक असल्याचे त्यांच्या विधानावरून दिसून येत आहे.

केंद्रातील मोदी सरकारला सातत्याने विविध आघाड्यांवर अपयश येत असतानाही विरोधकांना हे मुद्दे लावून धरता आलेले नाहीत. मोदींचा पराभव करायचा असल्यास काय करायला हवे, याविषयी एका मुलाखतीत शरद पवार यांनी यावर नुकतेच भाष्य केले असून यात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना आज देशात पर्याय पाहिजे आहे. मात्र हा पर्याय उभा करण्यात विरोधी पक्षांना अपयश आले आहे, असे पवार यांनी म्हटले आहे.

visit : npnews24.com