कोण मोडणार ४०० धावांचा ‘तो’ विक्रम? लारा ने सांगितली ‘या’ दोन भारतीयांची नावे

0

एन पी न्यूज 24 –  ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरने पाकिस्तानविरोधातील सामन्यात नाबाद ३३५ धावांची खेळी करून ब्रायन लाराच्या कसोटी क्रिेकेटमधील सर्वात मोठ्या व्यक्तीगत ४०० धावांच्या विश्व विकमाच्या जवळ जाण्यापर्यंत मजल मारली होती. पण तो व्रिकम मोडणे वॉर्नरला शक्य झाले नाही. यामुळे लाराचा हा विक्रम कोण मोडणार, अशी चर्चा क्रिकेट विश्वात सुरू झाली असताना स्वत: ब्रायन लाराने याबाबत मोठे भाष्य केले आहे.

लाराने म्हटले आहे की, भारतात असे दोन फलंदाज आहेत जे माझा विश्व विक्रम मोडू शकतात. भारताचे रोहित शर्मा आणि पृथ्वी शॉ हे दोघे फलंदाज ४०० धावांची खेळी करू शकतात. रोहित शर्मासारख्या फलंदाजाची बॅट तळपू लागली तर तो काहीही करू शकतो. तो या विक्रमापर्यंत पोहचू शकतो. पृथ्वी शॉ सुद्धा हे काम करू शकतो.

 

visit : npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.