उन्नाव बलात्कारप्रकरण : आमदार कुलदीप सेंगरच्या शिक्षेवर १६ डिसेंबरला निर्णय

0

उन्नाव : एन पी न्यूज 24 – उन्नाव बलात्कारप्रकरणी आज दिल्ली न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे. भाजपाचा माजी आमदार कुलदीप सिंह सेंगरला याप्रकरणी शिक्षा होणार की नाही, यावर आता न्यायालय १६ डिसेंबरला निर्णय देणार आहे.

उन्नाव बलात्कारप्रकरणातील मुख्य आरोपी कुलदीप सिंह सेंगर आणि शशी सिंह या दोघांवर न्यायालय निकाल देणार असल्याचे समजते. जर कुलदीप सेंगरला दोषी ठरवण्यात आले तर त्यास जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते, असे म्हटले जात आहे. तर शशी सिंहवर पीडितेला भाजप आमदार सेंगरकडे घेऊन जाण्याचा आरोप आहे. शशी सिंह या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर पीडितेवर बलात्कार करण्यात आला होता. या प्रकारणी पाच एफआयआर दाखल आहेत.

 

आरोपी आमदार कुलदीप सिंह सेंगर सध्या तिहार जेलमध्ये आहे. त्याच्यावर कलम १२० ब, (गुन्हेगारी कट), ३६३ (अपहरण), ३६६ (अपहरण आणि महिलेवर विवाहासाठी दबाव टाकणे), ३७६ (बलात्कार) आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हे दाखल आहेत.

visit : npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.