उद्धव ठाकरे अजूनही पक्षप्रमुखासारखेच वागतात : मनसे

मुंबई : एन पी न्यूज 24 – मनसेच्या बेस्ट कामगार सेनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायची होती, मात्र ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलींद नार्वेकर यांनी कुठलाही प्रतिसाद न दिल्याने मनसेने नाराजी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे हे अजूनही पक्षप्रमुख असल्याप्रमाणेच वागत आहेत, असा आरोप मनसेने केला आहे. याबाबत मनसेने सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.
मनसेने एक निवेदन मुख्यमंत्री कार्यालयात दिले होते, तेच निवेदन घेवून शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सुभाष देसाई यांची भेट घेतली. मात्र मनसेच्या शिष्टमंडळाला डावलण्यात आले, अशी नाराजी मनसेने व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांनी पक्षपात करू नये, अशी विनंती मनसेने केली आहे. दरम्यान, केंद्र आणि राज्यातील प्रश्नांवर मनसेची एक महत्वाची बैठक आज होत असून या बैठकीत राज ठाकरे येत्या काळात जनतेच्या प्रश्नावरून राज्य आणि केंद्र सरकारला एकाच वेळी लक्ष्य करू शकतात.
visit : npnews24.com