‘शिवनेरी’ किल्ल्यावर शिवसृष्टी उभारा : अमोल कोल्हे
नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – शिवनेरी किल्ल्यावर शिवसृष्टीची निर्मित्ती करावी, अशी मागणी पुण्यातील शिरुर मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज संसदेत शून्यप्रहारात केली. लोकसभा निवडणुकीदरम्यान डॉ. कोल्हे यांनी भक्ती-शक्ती कॅरिडॉर अंतर्गत किल्ले शिवनेरीवर शिवसृष्टीची निर्मिती करण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी त्यांनी ही मागणी केली.
खासदार कोल्हे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेले किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी शिवसृष्टीची निर्मिती झाली तर शिवभक्तांसाठी हे एक प्रेरणास्थळ असेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा जगासाठी प्रेरणादायी आहे. शिवसृष्टीच्या निर्मितीमुळे जगाला छत्रपती शिवरायांचा जीवनपट अनुभवता येईल. तसेच, रोजगार निर्मिती होऊन पर्यटनास चालनाही मिळेल.
visit : npnews24.com