खेळाडू मातेने ‘लाईव्ह मॅच’मध्ये ७ महीन्याच्या बाळाला पाजले दूध, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

0

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – मिझोराम स्टेट गेम्स २०१९ मध्ये सोमवारी व्हॉलीबॉल मॅचच्या दरम्यान कोर्टवर एक वेगळेच दृश्य अनेकांनी अनुभवले. या दृश्याने केवळ येथे उपस्थित लोकांनीच नव्हे, तर सोशल मीडियावरील हजारो लोकांनी एका खेळाडू मातेची भरभरून प्रशंसा केली आहे.

हॉलीबॉल मॅच सुरू असताना मध्यांतराची बेल वाजताच कोर्टवरील महिला खेळाडू लालवेंतलुआंगी ही लगबगीने कोर्टाच्या बाहेर गेली आणि तिने आपल्या ७ महिन्यांच्या बाळाला जवळ घेऊन दूध पाजण्यास सुरूवात केली. हे दृश्य पाहून अनेकजण आवाक झाले. साऱ्यांनाच या मातेचा अभिमान वाटला. दरम्यान, यावेळी कुणीतरी हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. बघता-बघता हा फोटो प्रचंड व्हायरल झाला. हजारो युजर्सने लालवेंतलुआंगी या खेळाडू मातेची प्रशंसा केली आहे.

visit : npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.