भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना काँग्रेसकडून ऑफर

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – मनातील खदखद मांडण्यासाठी दिल्लीत गेलेले भाजपाचे नाराज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी पक्षाच्या नेत्यांची भेट घेण्याचे टाळल्याने आश्यर्च व्यक्त होत आहे. दरम्यान, खडसे यांनी इतर पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांनी काल भेट घेतली होती. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही ते भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे. खडसे हे भाजप सोडणार, अशी चर्चा सुरू असतानाच आता काँग्रेसने त्यांना खुली ऑफर दिली आहे.
राज्यातील काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले की, नाथाभाऊ काँग्रेसमध्ये आले तर उत्तमच होईल. ते आमचे आवडते व्यक्तिमत्व आहेत, त्यांची अवहेलना झालेली आम्हालादेखील आवडले नाही. त्यांच्याकडून आम्हाला प्रस्ताव नाही, आम्हीदेखील काही प्रस्ताव दिला नाही. पण, अशी माणसे पक्षात अली तर आनंदच होईल. पक्षाला बळकटी मिळेल.
visit : npnews24.com