सावधान! अशा फोन कॉलला फसलात तर रिकामे होईल बँक खाते

रोहतक : एन पी न्यूज 24 – ऑनलाइन फसवणूकीचे अनेक गुन्हे सध्या घडत आहेत. सायबर गुन्हेगार रोज अनेक लोकांना आपले सावज बनवतात. आतापर्यंत ओटीपी आणि पिन नंबरची माहिती घेऊन सायबर गुन्हेगार फसवणूक करत होते. मात्र, हे गुन्हेगार आता सावज अडकविण्यासाठी वेगळाच सापळला लावत आहेत. या सापळ्यात सुशिक्षित लोकसुद्धा अलगद अडकत आहेत.
हे सायबर भामटे आता पेटीएम केवायसी करण्याच्या बहाण्याने लोकांना मोबाइलवर एक लिंक पाठवतात. या लिंकवर मोबाइलधारकास क्लिक करण्यास सांगितले जाते. यावर क्लिक केल्यानंतर मोबाईलमध्ये एक अॅप डाउनलोड होते. हे अॅप इन्स्टॉल होताच पेटीएम खात्यातील जमा रक्कम गायब होते. ऑनलाइन फसवणूकीच्या अशा नव्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. पंजाबमधील रोहतक पोलिसांकडे मागील दोन दिवसात अशा ५ तक्रारी आल्या आहेत.
visit : npnews24.com