अमित शहांना इतिहासाचे धडे देण्याची गरज : शशी थरुर

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – अमित शहांना इतिहासाचे धडे द्यावे लागतील. कारण अमित शहा कोणत्याही गोष्टीचे खापर काँग्रेस आणि नेहरुंवर फोडण्याचे काम करतात, अशी टीका काँग्रेस नेते शशी थरुर यांनी केली. नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेला थरूर यांनी प्रत्युत्तर दिले.
नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत एका कार्यक्रमात बोलताना थरूर म्हणाले की, धर्माच्या आधारावर देशाचे विभाजन होऊ शकत नाही, पंडित नेहरु, बाबासाहेब आंबेडकर, राजेंद्र प्रसाद यांनीही असा विचार कधी केला नाही. १९३५ मध्ये हिंदू महासभेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडली. तर १९४० मध्ये मुस्लीम लीगच्या जिना यांनी मुस्लिम राष्ट्राची संकल्पना मांडली. काँग्रेसने कधीही धर्माच्या आधारावर राजकारण केले नाही. भाजपा एकमेव पक्ष आहे ज्याचे राजकारण हिंदुत्व, हिंदू यावर सुरु आहे.
visit : npnews24.com